ताज्या बातम्या
Central Industry Factory Fire : सेंट्रल इंडस्ट्री कारखान्याला आग; 3 जणांचा होरपळून मृत्यू
सेंट्रल इंडस्ट्री आग: सोलापूर कारखान्यात भीषण आग, 3 जणांचा मृत्यू.
सोलापूर शहरातील अक्कलकोट एमआयडीसी परिसरातील एका कारखान्यात भीषण आग लागली आहे. सेट्रंल इंडस्ट्री या कारखान्याला मध्यरात्री आग लागली आणि पाहता पाहता आगीने भीषण रुप धारण केले. सदर घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण अद्याप मिळाले नाही. अग्नीशमन दलांच्या जवावांनी 3 जणांना कारखान्यातून बाहेर काढलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तीन जणांचा आगीमध्ये होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कारखान्यामध्ये टॉवेल तयार केले जातात. त्या साहित्यामुळे आग पसरली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. धूरांचे लोट लांबच लांब पसरले आहेत.