Borivali Fire : बोरिवलीत गोराई परिसरात आग; आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु

मुंबईतील बोरिवली पश्चिम येथील गोराई येथील साई स्मृती सोसायटीमध्ये आज सकाळी १२ वाजण्याच्या सुमारास अचानक भीषण आग लागली.
Published by :
Riddhi Vanne

थोडक्यात

  • बोरिवलीत गोराई परिसरातील साई स्मृती सोसायटीत आग

  • आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

  • गोदामात काही लोक अडकल्याची माहिती

  • अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू

मुंबईतील बोरिवली पश्चिम येथील गोराई येथील साई स्मृती सोसायटीमध्ये आज सकाळी १२ वाजण्याच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. सोसायटीमध्ये एक सजावटीचे गोदाम बांधले होते. आगीमुळे गोदाम राख झाले.

आगीचे कारण कळू शकलेले नाही. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १० गाड्या तात्काळ घटनास्थळी पोहोचल्या आणि आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. गोदामात काही लोक अडकल्याचे वृत्त आहे. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून बचावकार्य सुरू आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com