Pune Fire News : पुण्याच्या नाना पेठेतील लाकडी वाड्याला भीषण आग; अग्निशमनच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल

पुण्यातील लाकडी वाड्याला भीषण आग तर अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न
Published by :
Prachi Nate

पुण्यातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील नाना पेठे, राम मंदिर शेजारी असलेल्या लाकडी वाड्यास आग लागली आहे. त्याठिकाणी अग्निशमन दलाकडून पाच वाहने दाखल झाले असून अग्नीशमन दलाकडून आग विझवण्याचे काम सुरू आहे. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली हे अजून समजू शकलेलं नाही.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com