OBC Melava Vijay Wadettiwar : "मुंबई, ठाण्यासह पुणेही जाम करू...GR रद्द केल्याशिवाय" वडेट्टीवारांनी सरकारला ठणकावलं

आज उपराजधानी नागपुरात ओबीसी समाजाचा महामोर्चा काढण्यात आला आहे. 2 सप्टेंबर रोजी काढण्यात आलेला जीआर रद्द करण्यात यावा प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे
Published by :
Prachi Nate

आज उपराजधानी नागपुरात ओबीसी समाजाचा महामोर्चा काढण्यात आला आहे. 2 सप्टेंबर रोजी काढण्यात आलेला जीआर रद्द करण्यात यावा प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. सदरील मोर्चा कोणत्याही पक्षाच्या बॅनर खाली नव्हे तर सखल ओबीसी समाजाचा हा मोर्चा असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.

राधाकृष्ण विखे पाटील इतके स्वार्थी राहू नये, ओबीसी तुमच्या ताटातल मांजर म्हणून जगायचं का...? असा प्रश्न यावेळी त्यांनी उस्थित केला. तसेच मनोज जरांगे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटलांना पुढची पिढी माफ करणार नाही. असा थेट इशारा विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रया देताना केला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com