CM Devendra Fadnavis : कुंभमेळा आंतरराष्ट्रीय दर्जाचा व्हावा; यासाठी उच्चस्तरीय बैठकीत घेतले 'हे' महत्त्वाचे निर्णय

CM Devendra Fadnavis : कुंभमेळा आंतरराष्ट्रीय दर्जाचा व्हावा; यासाठी उच्चस्तरीय बैठकीत घेतले 'हे' महत्त्वाचे निर्णय

नागपूर येथील हैद्राबाद हाऊस येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आगामी नाशिक कुंभमेळ्याच्या आयोजनासंदर्भात महत्त्वपूर्ण उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली.
Published by :
Team Lokshahi
Published on

नागपूर येथील हैद्राबाद हाऊस येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आगामी नाशिक कुंभमेळ्याच्या आयोजनासंदर्भात महत्त्वपूर्ण उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. या बैठकीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची देखील उपस्थिती लाभली.

या बैठकीत आगामी कुंभमेळ्याच्या व्यापक नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते विकास, वाहतूक व्यवस्थापन, नागरिकांसाठी मूलभूत सुविधा, सुरक्षा व्यवस्था आणि पर्यावरण रक्षण यांसारख्या महत्त्वाच्या मुद्यांवर विचारविनिमय झाला.

यावेळी महाराष्ट्र राज्य सरकारचे मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, गिरीष महाजन, खासदार स्मिता वाघ, आमदार देवयानी फरांदे, आमदार मंगेश चव्हाण तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

नाशिकमध्ये होणारा हा कुंभमेळा आंतरराष्ट्रीय दर्जाचा व्हावा, यासाठी राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्यात समन्वयाने नियोजन केले जात आहे. या बैठकीत कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी स्वतंत्र समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून लवकरच कार्यवाहीस सुरुवात होणार आहे.

हेही वाचा

CM Devendra Fadnavis : कुंभमेळा आंतरराष्ट्रीय दर्जाचा व्हावा; यासाठी उच्चस्तरीय बैठकीत घेतले 'हे' महत्त्वाचे निर्णय
Iran-Israel War Video : लक्ष्य निश्चित, गोळीबार आणि इराणचे लढाऊ विमान F-14 अवघ्या 2 सेकंदात नष्ट , Video Viral
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com