Pune Crime : पुण्यातील अत्याचार प्रकरणात मोठा खुलासा; Delivery boy आरोपी हा निघाला तरुणीचा मित्र
Pune Crime : पुण्यातील अत्याचार प्रकरणात मोठा खुलासा; Delivery boy आरोपी हा निघाला तरुणीचा मित्रPune Crime : पुण्यातील अत्याचार प्रकरणात मोठा खुलासा; Delivery boy आरोपी हा निघाला तरुणीचा मित्र

Pune Crime : पुण्यातील अत्याचार प्रकरणात मोठा खुलासा; Delivery Boy आरोपी हा निघाला तरुणीचा मित्र

Pune Crime : कोंढवा अत्याचार प्रकरणात आरोपी तरुणीचा मित्र निघाला.
Published by :
Team Lokshahi
Published on

कोंढवा परिसरात नुकत्याच घडलेल्या अत्याचार प्रकरणात नवा खुलासा समोर आला आहे. पोलिसांनी अटक केलेला आरोपी हा पीडित तरुणीचा जुना मित्र असल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना शहरात मोठी खळबळ उडवणारी ठरली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणीनगरमधील आयटी कंपनीत कार्यरत असलेली 25 वर्षीय तरुणी आपल्या भावासोबत कोंढव्यातील उच्चभ्रू सोसायटीत राहत होती. घटनेच्या दिवशी तिचा भाऊ बाहेरगावी गेला असताना ती घरी एकटी होती. संध्याकाळी साडेसातच्या सुमारास एका तरुणाने कुरिअर बॉय असल्याचे सांगत दरवाजा ठोठावला. कुरिअर नसल्याचे सांगितल्यावरही त्याने दस्तऐवजांवर स्वाक्षरी करण्याच्या बहाण्याने तिला सेफ्टी डोअर उघडण्यास भाग पाडले.

दरवाजा उघडल्यानंतर आरोपीने तिच्या चेहऱ्यावर स्प्रे फवारला आणि आत प्रवेश करून बलात्कार केला. तसेच त्याने तिचे फोटो काढून "मी परत येईन" असा संदेश तिच्या मोबाईलवर लिहून ठेवला. घाबरलेल्या पीडितेने तातडीने पोलिसांना माहिती दिली.

या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिसांनी 10 पथकांची नेमणूक केली होती. अखेर आरोपीला पुण्यातच अटक करण्यात आली आहे. हा आरोपी पीडित तरुणीचा जुना परिचित असल्याची माहिती तपासात समोर आली असून पुढील चौकशी सुरू आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com