नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर चक्क सुपारीवर साकारलं श्री महालक्ष्मीचं चित्र..

नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर चक्क सुपारीवर साकारलं श्री महालक्ष्मीचं चित्र..

कलेत नेहमीच वैविध्यपूर्ण उपक्रम राबवत तब्बल 6 विश्वविक्रम स्वतःच्या नावावर केलेल्या पाटण तालुक्यातील डाकेवाडी येथील कलावंत डाॅ.संदीप डाकवे यांनी चक्क सुपारीवर कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मीचे चित्र साकारले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

प्रशांत जगताप, सातारा

कलेत नेहमीच वैविध्यपूर्ण उपक्रम राबवत तब्बल 6 विश्वविक्रम स्वतःच्या नावावर केलेल्या पाटण तालुक्यातील डाकेवाडी येथील कलावंत डाॅ.संदीप डाकवे यांनी चक्क सुपारीवर कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मीचे चित्र साकारले आहे. नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही अनोखी कलाकृती केली आहे.

श्री महालक्ष्मीचे चित्र सुपारीवर साकारत असताना त्यातील बारकावे, नक्षीकाम आणि चित्रावर विशेष परिश्रम घेवून चित्र साकारावे लागते. या सुक्ष्मदर्शी कलाविष्कारासाठी डाॅ.डाकवे यांनी अनेक तास खर्च केले आहेत.

डाॅ.संदीप डाकवे यांनी आतापर्यंत खडूवर अष्टविनायक, मोरपिसावर संत तुकाराम, राजश्री शाहू महाराज, जाळीदार पानावर श्री गणेश, 1 सेमी आकारामध्ये श्रीकृष्ण अशा कलाकृती केल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com