Maharashtra Election : राज्यात अनेक इच्छुक उमेदवारांना झटका, आयोगाने घेतला मोठा निर्णय

Maharashtra Election : राज्यात अनेक इच्छुक उमेदवारांना झटका, आयोगाने घेतला मोठा निर्णय

राज्यात आता कोणत्याही क्षणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. पुढील काही दिवसात राज्य निवडणूक आयोगाकडून आचारसंहितेची देखील घोषणा होण्याची शक्यता आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

थोडक्यात

  • राज्यात अनेक इच्छुक उमेदवारांना झटका

  • आयोगाने घेतला मोठा निर्णय

  • कोणत्याही क्षणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजणार

राज्यात आता कोणत्याही क्षणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. पुढील काही दिवसात राज्य निवडणूक आयोगाकडून आचारसंहितेची देखील घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता इच्छुक उमेदवार देखील जोरदार धावपड करताना दिसत आहे. मात्र राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वीच अनेक इच्छुक उमेदवारांना धक्का बसणार आहे. याचा मुख्य कारण म्हणजे राज्य निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे ज्याचा मोठा फटका इच्छुक उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे.

सध्या दोनपेक्षा जास्त अपत्य असलेल्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक (Maharashtra Election Commission) लढवता येत नाही असा कायदा करण्यात आला आहे मात्र असं असून देखील अनेक उमेदवार दोनपेक्षा जास्त अपत्य लपवण्यासाठी अनेक प्रयत्न करताना दिसतात मात्र आता आयोगाने (Maharashtra Election) मोठा निर्णय घेतला आहे. दोनपेक्षा जास्त अपत्य लपवण्याचा प्रकार थांबवण्यासाठी आणि यावर उचित उपाययोजना करण्यासाठी आता राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे (Rahul Pandey) यांनी राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला सूचना दिल्या आहे. त्यांनी निवडणुकीत गैरप्रकार टाळण्यासाठी एसओपी तयार करण्याचे आदेश दिले आहे. जर उमेदवाराला 2001 नंतर दोनपेक्षा जास्त अपत्य असतील तर त्यांना निवडणूक लढवता येणार नाही असा कायदा करण्यात आला आहे.

मात्र यानंतर देखील अनेक उमेदवार दोनपेक्षा जास्त अपत्य लपवण्याची शक्कल लढवत असल्याने आता राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला सूचना देत निवडणुकीत गैरप्रकार टाळण्यासाठी एसओपी तयार करण्याचे आदेश दिले आहे. तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर 31 जानेवारी 2026 च्या आता राज्यात स्थानिक स्वरांज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहे. या निवडणुकांसाठी राज्यात 10 नोव्हेंबर रोजी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी लवकरच राज्य निवडणूक आयोगाकडून अधिसूचना देखील जारी करण्यात येणार आहे. त्यामुळे आता स्थानिक पातळीवर महायुती आणि महाविकास आघाडीकडून हालचालींना वेग आला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com