BMC Election 2026 : जागावाटपावरून महायुतीला धक्का, रामदास आठवले स्वबळावर लढणार
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेना (शिंदे गट) महायुतीला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मोठा राजकीय धक्का दिला आहे. अनेकदा इशारे देऊनही जागावाटपात शेवटपर्यंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) म्हणजेच रिपाईला झुलवत ठेवण्यात आल्याचा आरोप रामदास आठवले यांनी केला आहे. महायुतीकडून विश्वासघात झाल्याची भावना व्यक्त करत त्यांनी अखेर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी स्वतंत्रपणे ३९ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
रामदास आठवले यांनी यापूर्वी स्पष्टपणे सांगितले होते की भाजपने रिपाईला आपल्या कोट्यातून किमान सात जागा देण्याचे मान्य केले आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सकारात्मक संकेत दिले होते. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम वेळ जवळ येऊनही रिपाईच्या कोणत्याही उमेदवाराला अधिकृत यादीत स्थान देण्यात आले नाही. या पार्श्वभूमीवर रिपाईने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे आठवले यांनी जाहीर केले.
मुंबईतील अनेक वॉर्डांमध्ये आंबेडकरी व दलित समाजाचा प्रभाव मोठा आहे. या समाजाचा मोठा वर्ग आजवर रामदास आठवले यांच्यामुळे महायुतीच्या पाठीशी उभा राहिला होता. मात्र, आता रिपाईचे स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरल्यामुळे दलित मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. याचा थेट फटका भाजप आणि शिंदे गटाला बसू शकतो, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
महानगरपालिका निवडणुकीत १०० ते २०० मतांचाही फरक निर्णायक ठरू शकतो. त्यामुळे रिपाईचे उमेदवार अनेक ठिकाणी महायुतीसाठी डोकेदुखी ठरू शकतात. आता या परिस्थितीत रामदास आठवले यांना पुन्हा सोबत ठेवण्यासाठी भाजप आणि महायुतीकडून कोणती पावले उचलली जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) मुंबईतील उमेदवारांची यादी
स्नेहा सिद्दार्थ कासारे- वॉर्ड क्रमांक 186
रॉबिनसन मारन नायागाम- वॉर्ड क्रमांक 188
बापूसाहेब योहान काळे- वॉर्ड क्रमांक 181
सचिनभाई मोहिते- वॉर्ड क्रमांक 200
रमेश शंकर सोनावणे- वॉर्ड क्रमांक 146
दिक्षा गायकवाड- वॉर्ड क्रमांक 152
ज्योती जेकटे- वॉर्ड क्रमांक 155
प्रज्ञा सदाफुले- वॉर्ड क्रमांक 147
संजय डोळसे- वॉर्ड क्रमांक 153
संजय इंगळे- वॉर्ड क्रमांक 154
निलीमा मानकर- वॉर्ड क्रमांक 198
गणेश वाघमारे- वॉर्ड क्रमांक 210
विनोदकुमार साहू- वॉर्ड क्रमांक 223
मनोहर कुलकर्णी- वॉर्ड क्रमांक 214
श्रावण मोरे- वॉर्ड क्रमांक 90
मनिषा संजय डोळसे- वॉर्ड क्रमांक 153
नितीन कांबळे- वॉर्ड क्रमांक 89
सचिन कासारे- वॉर्ड क्रमांक 93
विक्रांत विवेक पवार- ९८ उत्तर मध्य मुंबई
नम्रता बाळासाहेब गरुड-उत्तर मध्य मुंबई
विनोद भाऊराव जाधव-१०४- उत्तर मध्य मुंबई
रागिणी प्रभाकर कांबळे, १०३- ईशान्य मुंबई
राजेश सोमा सरकार- १२०, ईशान्य मुंबई
हेमलता सुनिल मोरे- ११८, ईशान्य मुंबई
राजेंद्र कृष्णा गांगुर्डे, १२५, ईशान्य मुंबई
भारती भागवत डोके, १३३, ईशान्य मुंबई
सतिश सिध्दार्थ चव्हाण, १४०, ईशान्य मुंबई
यशोदा शिवराज कोंडे, २८, उत्तर मुंबई
अभिजित रमेश गायकवाड, २६, उत्तर मुंबई
रेश्मा अबु खान, ५४ उत्तर मुंबई
छाया संजय खंडागळे ८१ उत्तर पश्चिम
अजित मुसा कुट्टी, ५९- उत्तर पश्चिम
जयंतीलाल वेलजी गडा, ६५- उत्तर पश्चिम
बाबू अशापा धनगर, ६३- उत्तर पश्चिम
वंदना संजय बोरोडे, ३८- उत्तर पश्चिम
राधा अशोक यादव, ३९- उत्तर पश्चिम
प्रेमलता जितेंद्र शर्मा, ४०- उत्तर पश्चिम
धनराज वैद्यनाथ रोडे,४३- उत्तर पश्चिम
शिल्पा बेलमकर- वॉर्ड क्रमांक 150
