ताज्या बातम्या
Jalgaon : जळगावात दहावीच्या विद्यार्थीनीवर स्कूल बस चालकानेच केला अत्याचार
जळगाव अत्याचार: स्कूल बस चालकाने दहावीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याने जिल्ह्यात खळबळ.
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात एका दहावीच्या विद्यार्थिनीवर स्कूल बस चालकाने बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला असून एका शेतात नेऊन बस चालकाने विद्यार्थीला धमकी देत बलात्कार केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी गेल्या दोन दिवसांपूर्वी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा हा दाखल करण्यात आलेला होता. मात्र बस चालकाने बलात्कार केल्याचा पुरवणी जवाब पीडितेने दिल्याने या प्रकरणी पोलिसांनी संशयित 38 वर्षीय बस चालक अबिद हुसेन शेख जलील याला अटक करून त्याच्याविरुद्ध बलात्कारासह पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी संशयित आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.