Phaltan Doctor Suicide Special Report :
Phaltan Doctor Suicide Special Report : Phaltan Doctor Suicide Special Report :

Special Report Phaltan : कर्तव्यदक्ष डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू!; घटनेनं फलटण हादरलं, राज्यात संताप

साताऱ्याच्या उपजिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या एका महिला डॉक्टरनं अत्याचार आणि मानसिक छळाचा आरोप करत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली...
Published by :
Riddhi Vanne
Published on

Phaltan Doctor Suicide Special Report :  साताऱ्याच्या उपजिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या एका महिला डॉक्टरनं अत्याचार आणि मानसिक छळाचा आरोप करत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली... या घटनेनं फक्त साताराच नाही, तर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणावरून राजकीय पातळीवरही आरोप-प्रत्यारोप रंगताना दिसत आहेत... पाहुयात याचसंदर्भातील हा विशेष रिपोर्ट...

फलटणमधील एका हॉटेलच्या रूममध्ये ही महिला डॉक्टर मृतावस्थेत सापडली.... ती दोन दिवसांआधी हॉटेलमध्ये आली होती... दिवसभर दरवाजा न उघडल्यानं कर्मचाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी दरवाजा उघडला असता ही धक्कादायक घटना उघड झाली.... पोलिसांना माहिती दिल्यानंतर, मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांना डॉक्टरच्या हातावर लिहिलेली सुसाईड नोट आढळून आली, ज्यात तिने दोन व्यक्तींवर गंभीर आरोप केले होते

हातावर लिहिलेली सुसाईड नोट

माझ्या मरण्याचं कारण पोलीस उपनिरीक्षक बदने, ज्याने माझ्यावर चार वेळा बलात्कार केला, आणि बनकर, ज्याने मागील काही महिन्यांपासून मानसिक आणि शारीरिक छळ केला.

या सुसाईड नोटनंतर राज्य सरकार आणि पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य महिला आयोगाने घटनेची तातडीने दखल घेतली असून, आरोप असलेल्या पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. तपासात आरोपी प्रशांत बनकरला पोलिसांनी अटक केली आहे, तर पोलीस उपनिरीक्षक बदने अजूनही फरार असून त्याचा शोध सुरू आहे.... घटनेच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.दरम्यान, या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळताना दिसत आहे... ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते यांनी एका माजी खासदारावर गंभीर आरोप केले आहेत...

अंबादास दानवे - तरुणीच्या पत्रात माजी खासदारांच्या दोन स्वीय सहाय्यकांचा उल्लेख आहे. मात्र, त्यांची नावे दिलेली नाहीत. ही नावं मी तुम्हाला सांगतो. राजेंद्र शिंदे आणि नाग टिळक हे दोघे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे पीए होते. त्यांनीच डॉक्टर तरुणीचे माजी खासदारांशी फोनवरुन बोलणं करुन दिलं. याच दबावातून तरुणीने आत्महत्या केली. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना देखील या प्रकरणात सहआरोपी करा. तसेच महाडिक नावाच्या पोलीस अधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल करा.

महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या घटनेनंतर राज्यातील कायदा-सुव्यवस्था आणि गृहखात्याचा कारभार पुन्हा एकदा राजकीय चर्चेचा विषय बनला आहे... यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर हल्लाबोल केला असून, भाजपकडूनही त्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे...

संजय राऊत - महाराष्ट्राचं चित्र अत्यंत गंभीर आहे. राज्यातल सरकार हे सरकारसारखं काम करत नाहीये. सरकारची प्रशासनावर पकड नाही , गृहखातं हे अजगरासारखं निपचित पडलं आहे

नवनाथ बन - हे उद्धवजींचं सरकार नाही, देवा भाऊंचं कायद्याचं राज्य आहे! पालघरमध्ये साधू मारले तेव्हा गप्प होतात. वाजेंची वसुली नाही तर लोकांच्या सेवेसाठी देवा भाऊंचं सरकार))

महिला डॉक्टरच्या आत्महत्येमागचं कारण नेमकं काय हे अद्याप तपासात स्पष्ट झालेलं नाही.... मात्र या घटनेनं वैद्यकीय क्षेत्र, कायदा-सुव्यवस्था आणि राजकीय वर्तुळ सगळंच हादरून गेलं आहे... सत्य उघड होण्यासाठी आणि दोषींना कठोर शिक्षा मिळावी, अशी राज्यभरातून मागणी होत आहे... त्यामुळे तपासाचा वेग आणि प्रशासनाची पारदर्शकता आता या प्रकरणात महत्वाची ठरणार आहे...

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com