Video Viral : माता न तू वैरिणी! चिमुकलीच्या गळ्यावर पाय, स्टीलच्या चमच्याचे चापटे; जन्मदात्या आईची पोटच्या लेकीला बेदम मारहाण
Diva Crime Video Viral : ठाणे जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यशोदा ब्राह्मया 28 वर्षीय आईने आपल्या साडेचार वर्षाची चिमुकलीला स्टीलच्या चमच्याने बेदाम मारहाण केली. दिवा प्रभाग समिती अंतर्गत साबेगावातील म्हात्रे बिल्डिंगमध्ये हा प्रकार घडला आहे. मारहाणीचा व्हिडिओ त्याच आईच्या मोठ्या मुलीने शूट केली आहे.सदर घटनेची माहिती मिळताच दिवा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. महिलेला मुंब्रा पोलीस ठाण्यात आणून त्याचा जबाब नोंदवला..
आरोपी आईवर भारतीय न्याय संहिता सेक्शन ११५(२), ११८(१), ७५ बालसरंक्षण अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मुंब्रा पोलीस स्टेशन PSI अनिल सोनवणे यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. साडेचार वर्षीय चिमुकलेला बेदम मारहाण करणारी आई यशोदा ब्राह्मया याला नोटीस देऊन सोडण्यात आलेला आहे. मुलीला महिला व बालकल्याण समिती उल्हासनगर या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे. पुढील तपास मुंब्रा पोलीस स्टेशनच्या माध्यमातून करण्यात येत आहे.