Amravati Hanamari
Amravati HanamariAmravati Hanamari

Amravati Hanamari : अमरावतीत जल्‍लोषाचे रुपांतर हत्याकांडात, 1 मृत्यू,12 जखमी

अंजनगाव सुर्जी येथील विजयाच्या जल्लोषात अचानक एक धक्कादायक घटना घडली. जल्लोषाच्या दरम्यान झालेल्या वादातून मोहम्मद जाकीर शेख नजीर यांची हत्या करण्यात आली.
Published by :
Riddhi Vanne
Published on

Amravati Crime : अंजनगाव सुर्जी येथील विजयाच्या जल्लोषात अचानक एक धक्कादायक घटना घडली. जल्लोषाच्या दरम्यान झालेल्या वादातून मोहम्मद जाकीर शेख नजीर यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणातील १२ आरोपी फरार आहेत, ज्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

विजयाचा आनंद साजरा करत असताना दोन गटांमध्ये शाब्दिक वाद झाले. या वादामुळे ते अधिक चिघळले आणि अखेर हाणामारीत रूपांतरित झाले. त्याच दरम्यान, मोहम्मद जाकीर शेख नजीर यांच्यावर हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारांच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर अंजनगाव सुर्जी पोलिस त्वरित घटनास्थळी पोहोचले. परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात तणाव निर्माण झाला आहे. या प्रकरणी संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवला गेला असून, फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

थोडक्यात

  • अंजनगाव सुर्जी येथील विजयाच्या जल्लोषात अचानक एक धक्कादायक घटना घडली.

  • जल्लोषाच्या दरम्यान झालेल्या वादातून मोहम्मद जाकीर शेख नजीर यांची हत्या करण्यात आली.

  • या प्रकरणातील १२ आरोपी फरार आहेत, ज्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com