Amravati : धक्कादायक! 9 महिन्यांत 60 कुमारी मातांची प्रसूती; नेमकं प्रकरण काय?
थोडक्यात
अमरावती जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार समोर
9 महिन्यात 60 कुमारी मातांची प्रसूती
अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात नोंद
(Amravati) अमरावतीमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 9 महिन्यांत तब्बल 60 कुमारी मातांची प्रसुती झाली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयांत जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्याच्या कालावधीमध्ये अठरा वर्षाखालील 60 अल्पवयी मुलींची प्रसूती करण्यात आली आहे. त्यांच्यावर कोवळ्या वयातच मातृत्व लादण्यात आले आहे. लैंगिक अत्याच्यार तसेच बालविवाहातून या मुली कुमारी मता बनल्याची धक्कादायक माहिती आहे. रुग्णालय प्रशासनाकडून मुली संदर्भात माहिती देखील पोलीस तसेच महिला व बालविकास विभागाला देण्यात आली आहे.
अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हे आदिवासी बहुलक्षेत्र आहेत त्या ठिकाणी आजही अनेक शासनाच्या योजना पोहोचल्या नाहीत शिक्षणाचा देखील मोठा अभाव असून आजही त्या ठिकाणी आदिवासी भागात बालविवाहाचे प्रमाण अधिक दिसून येत आहे.
