Pandharpur Accident : पंढरपूरवरून परतताना एसटीचा अपघात, अपघातात जवळपास 30 जण जखमी
काल 6 जुलैला राज्यभरात आषाढी एकादशी साजरा करण्यात आली. तर अनेक वारकरी गेल्या काही दिवसांपासून पंढरपूरच्या दिशेने वारी करत होते. काल आषाढी एकादशी झाल्यानंतर भाविक पंढरपूरवरून माघारी येत असताना एक दु:खद घटना घडली आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या चिखलीजवळ महाबीज कार्यालयासमोर एस टी बस दुभाजकावर आढळून पलटी होऊन बसचा अपघात झाला आहे.
हा अपघात आज रात्री 3 वाजताच्या सुमारास झाला आहे. या अपघातात जवळपास 30 प्रवाशी भाविक जखमी झाले आहेत. तर जखमी भविकांवर चिखली आणि बुलढाणा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बस पंढरपूर वरून खामगाव जात होती त्यावेळेस हा अपघात झाला आहे.
या बसमध्ये 51 भाविक प्रवास करत होते. पंढरपूर सोहळा आटोपून भाविक घरी जात असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे. अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही अशी माहिती सुत्रांकडून मिळते आहे. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी भाविकांना तत्काळ मदत केली आहे. जखमी भाविकांना चिखली व बुलढाणा सामान्य रुग्णाल्यात भरती करण्यात आले आहे.