कोकण रेल्वे मार्गावर २६ डिसेंबरला कळंबणी ते कामथे दरम्यान अडीच तासांचा मेगाब्लॉक

कोकण रेल्वे मार्गावर २६ डिसेंबरला कळंबणी ते कामथे दरम्यान अडीच तासांचा मेगाब्लॉक

कोकण रेल्वे मार्गावर मंगळवार दिनांक 26 डिसेंबर 2023 रोजी अडीच तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. रेल्वे मार्गाच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी खेडमधील कळंबणी बुद्रुक तसेच चिपळूण तालुक्यातील कामथे स्थानकादरम्यान रेल्वेचा हा मेगाब्लॉक असेल.
Published by :
shweta walge

कोकण रेल्वे मार्गावर मंगळवार दिनांक 26 डिसेंबर 2023 रोजी अडीच तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. रेल्वे मार्गाच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी खेडमधील कळंबणी बुद्रुक तसेच चिपळूण तालुक्यातील कामथे स्थानकादरम्यान रेल्वेचा हा मेगाब्लॉक असेल. या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार 26 डिसेंबर रोजी दुपारी 12:40 पासून 3 वाजून दहा मिनिटांपर्यंत अडीच तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे.

या गाड्यांच्या वेळापत्रक होणार परिणाम

1) कोकण रेल्वे मार्गावरील मेगाब्लॉकमुळे 02197 कोईमतूर ते जबलपूर ही दिनांक 25 डिसेंबर रोजी प्रवासाला निघालेली विशेष रेल्वे गाडी कणकवली ते संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकादरम्यान एक तास 45 मिनिटे रोखून ठेवली जाणार आहे.

2) मेगा ब्लॉकचा परिणाम होणारी दुसरी गाडी सावंतवाडी रोड ते दिवा जंक्शन दरम्यान धावणारी एक्सप्रेस गाडी (10106) असेल. 26 डिसेंबर ची ही गाडी सावंतवाडी ते रत्नागिरी दरम्यान एक तास पंधरा मिनिटे थांबवून ठेवली जाणार आहे.

मेगा ब्लॉकच्या कालावधीत दोन गाड्यांच्या वेळापत्रकातील बदल प्रवाशांनी लक्षात घेऊन आपल्या प्रवासाचे नियोजन करावे असे आवाहन कोकण रेल्वेकडून करण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com