बोरिवली कोरा केंद्र येथे दोन दिवसीय संरक्षण प्रदर्शन; राज्यपाल रमेश बैस यांची उपस्थिती
Admin

बोरिवली कोरा केंद्र येथे दोन दिवसीय संरक्षण प्रदर्शन; राज्यपाल रमेश बैस यांची उपस्थिती

भाजप आमदार सुनील राणे आणि अथर्व फाउंडेशनच्या वतीने मुंबई बोरिवली येथे संरक्षण प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

भाजप आमदार सुनील राणे आणि अथर्व फाउंडेशनच्या वतीने मुंबई बोरिवली येथे संरक्षण प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला राज्याचे राज्यपाल रमेश बैस हे उद्घाटनासाठी उपस्थित आहेत.

बोरिवली पश्चिमेकडील कोरा केंद्र मैदान 2 येथे या संरक्षण प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून हे प्रदर्शन दोन दिवस नागरिकांसाठी खुले असणार आहे. यावेळी राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते सीमेवर शहीद झालेल्या वीर जवानांच्या मुलांना लॅपटॉप वाटप देखील करण्यात आले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com