दादा भुसेंचा तरुणांना अश्लील भाषेत शिवीगाळ करत मारल्याचा व्हिडिओ व्हायरल

दादा भुसेंचा तरुणांना अश्लील भाषेत शिवीगाळ करत मारल्याचा व्हिडिओ व्हायरल

भाजप आणि शिंदे गटाकडून महाविकास आघाडी आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांवर जोरदार आरोप होत आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

भाजप आणि शिंदे गटाकडून महाविकास आघाडी आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांवर जोरदार आरोप होत आहेत. राज्याच्या सुरू असेलल्या हिवाळी अधिवेषनावेळी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर घोटाळ्याचे आरोप करण्यात आले. यातच आता मंत्री दादा भुसे यांच्याविरोधात जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडिओ ट्वीट केले आहे.

या व्हिडिओत दादा भुसे हे तरुणाला शिवीगाळ करत मारहाण करत असल्याचे दिसून येत आहे. सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ कधीचा आहे. याची माहिती नाही आहे.

मंत्री दादा भूसे फटकावतात. शिव्या देतात. मुख्यमंत्री साहेब, कुठला गुन्हा पोलिस घेणार? असे आव्हाड यांनी हा व्हिडिओ शेअर करुन म्हटले आहे. तरुणाला धमकावल्याचा आरोप त्या व्हिडिओच्या माध्यमातून आव्हाड यांच्याकडून करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com