Vaishnavi Hagwane Case : कमरेला पिस्तूल; पार्टीत बेभान होत नाचणाऱ्या निलेश चव्हाणचा Video Viral
वैष्णवी हगवणे प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात अडकलेला निलेश चव्हाण याच्याविरोधात पुण्यातील वारजे माळवाडी पोलिसात कस्पटे कुटुंबाला धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश चव्हाणचा हगवणे कुटुंबियांशी काय संबंध आहे. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात त्याचा काही हात आहे की नाही, या सर्व गोष्टींवर तर्क वितर्क सुरू असतानाच निलेश चव्हाणचा एक जुना व्हिडिओ आता माध्यमांसमोर आला आहे. या व्हिडिओमध्ये निलेश चव्हाण एका व्यक्तीच्या खांद्यावरून बेभानपणे नाचताना दिसत आहे. विशेष म्हणजे यावेळी त्यांच्या कमरेला पिस्तूल असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
निलेश चव्हाण याच्या घरावर मध्यरात्री पुणे पोलिसांनी छापेमारी केली आहे. या छापेमारीमध्ये निलेश चव्हाणच्या घरातून लॅपटॉपसह इतर वस्तू जप्त करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. चव्हाणच्या लॅपटॉपमध्ये अनेक संशयित वस्तू असल्याचा पोलिसांना संशय असून लॅपटॉपमध्ये अनेक अश्लील व्हिडिओ असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, निलेश चव्हाण आज सायंकाळी पोलिसांना स्वाधिन होणार असल्याचे सांगितले जात आहे.