Chitra Kishor Wagh
Chitra Kishor WaghTeam Lokshahi

पुण्यात कॉन्स्टेबलकडून महिलेला बेदम मारहाण, चित्रा वाघ संतापल्या

पुण्यात कॉन्स्टेबलकडून पोलीस चौकीत महिलेला बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीत महिलेच्या चेहऱ्याला इजा आणि दृष्टीही अधू झाली आहे.
Published by :
Pankaj Prabhakar Rane
Published on

पुणे : पुण्यात कॉन्स्टेबलकडून पोलीस चौकीत महिलेला बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीत महिलेच्या चेहऱ्याला इजा आणि दृष्टीही अधू झाली आहे. नो पार्किंगमध्ये गाडी लावण्यास विरोध केल्यानं मारहाणीचा आरोप करण्यात आला आहे.

Saffron Project : महाराष्ट्रातील आणखी एक प्रकल्प राज्याबाहेर?

भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी संबंधीत कॉन्स्टेबलवर कडक कारवाई करावी, अशी मागणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. स्त्रीवर हात उगारणाऱ्या व्यक्तीला कॉन्स्टेबल म्हणून काम करण्याचा काहीही अधिकार नाही…तिच्या अंगावर मारहाणीचे व्रण असतांना FIR ऐवजी का NC घेतलीत? असा सवाल चित्रा वाघ यांनी पुणे पोलीसांकडे केला आहे.

दरम्यान, पुण्यात एका महिलेला कॉन्स्टेबलने पोलिस चौकीत बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत या महिलेच्या चेहऱ्याला गंभीर इजा झाली आहे. पीडितेच्या डोळ्याला देखील गंभीर इजा झाली आहे. या महिलेने तिच्या दुकानासमोर नो पार्किंमध्ये गाडी लावणाऱ्या राहुल शिंगे नावाच्या कॉन्स्टेबलला विरोध केल्यामुळे शिंगेने या महिलेला मारहाण केलीय.

मात्र पुणे पोलिस या प्रकरणाची तक्रार नोंद करून घेण्यास देखील तयार नाहीत. कांचन दोडे असे मारहाण झालेल्या महिलेचे नाव आहे. पुण्यातील मंडई पोलिस चौकीत दोडे यांना मारहाण करण्यात आलीय. शिंगेने केलेल्या मारहाणीमुळे कांचन दोंडे यांच्या उजव्या दृष्टीवर परिणाम झाला असून त्यांना या डोळ्याने अंधुक दिसत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com