“मी देवेंद्र फडणवीसांच्या जागी असतो तर…” आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला

“मी देवेंद्र फडणवीसांच्या जागी असतो तर…” आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला

आदित्य ठाकरे आज रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. शिवसैनिकांशी संवाद साधला. भाषणादरम्यान त्यांनी अनेक विषयावर भाष्य केलं आहे. सध्या सुरु असलेला वेदांता प्रकल्प गुजरातला हलवण्यात आलेला विषय यावरुन राजकारण चांगलेत तापले आहे.

यावरुन आदित्य ठाकरे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करतानाच त्यांनी शिंदे गटावर पुन्हा एकदा गद्दारी केल्याची टीका केली आहे. मात्र, त्याचवेळी आदित्य ठाकरेंनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पण खडेबोल सुनावले आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की, “मी देवेंद्र फडणवीसांच्या जागी असतो, तर मी माझा स्वाभिमान सांभाळला असता. मी माझ्या पक्षाची प्रतिमा सांभाळली असती. या सरकारमधून बाहेर पडलो असतो आणि पुन्हा एकदा निवडणुकांना सामोरा गेलो असतो. या ४० लोकांसोबत बसलो नसतो”, अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी फडणवीसांना सुनावले

यासोबतच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंडखोरी करून बाहेर पडलेल्या ४० आमदारांवर भाष्य केलं आहे. “तुमच्यात हिंमत होती तर समोरून यायला पाहिजे होतं. असं गद्दारांसारखं मागून पाठीत वार करायला नको होता. म्हणे आमच्या बंडाची नोंद ३३ देशांनी घेतली. पण तुमच्या बंडाची नाही, गद्दारीची नोंद ३३ देशांनी घेतली आहे. महाराष्ट्रानं तर चांगलीच नोंद घेतली आहे. यांना उठाव करायचा असता, तर जागेवरच उभे राहिले असते. पण हे पळून गेले”, “आपली चूक एवढीच झाली की आपण त्यांना लायकीपेक्षा जास्त दिलं. त्यांना अपचन झालं आणि हाजमोला खायला त्यांना पलीकडे जावं लागलं. हे ४० लोक निर्लज्जपणे सगळीकडे फिरायला लागले आहेत” असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला आहे.

Lokshahi
www.lokshahi.com