Latest Marathi News Update live : विरोधी पक्षनेत्या म्हणून किशोरी पेडणेकर यांच्या नावाची घोषणा होणार

Lokshahi Marathi Live Headlines Updates: आज रविवार, दिनांक 16 फेब्रुवारी 2026, आजच्या ताज्या बातम्या, पत्रकार परिषद, मुलुंडमधील दुर्घटना प्रकरण, नाशिक महापालिकेची सभा, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर..
Latest Marathi News Update live
Latest Marathi News Update live

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे पुण्याहून रेल्वेच्या सेवेत वाढ.

रेल्वे प्रशासनाने उन्हाळ्याच्या सुट्टीत वाढती गर्दी लक्षात घेता प्रवाशांच्या सोयीसाठी पुण्याहून धावणाऱ्या रेल्वेच्या सेवेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे

यात खडकी- हिसार,दौंड - अजमेर सोलापूर - अजमेर या रेल्वे गाड्यांचा समावेश आहे

यामुळे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे

शिष्यवृत्ती परीक्षांच्या अर्जासाठी मुदतवाढ

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित शिष्यवृत्ती परीक्षेच्या अर्जासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे

त्यानुसार आता 28 फेब्रुवारी पर्यंत शाळा नोंदणीसह विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत

माणिकराव कोकाटेंची आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

- बेकायदेशीरपणे शासनाच्या सदनिका लाटल्या प्रकरणी सुनावणी

- बनावट कागदपत्रे सादर केल्याचा कोकाटे यांच्यावर आरोप

- सदनिका लाटल्या प्रकरणी कोकाटे यांना जिल्हा सत्र न्यायालयाने ठरविले होते दोषी

- न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत शिक्षेवर कोकाटे यांनी सर्वोच्च न्यायालयात मिळवला होता अंतरीम जामीन

Pune: पुण्यात गांजाचा मोठा साठा जप्त

14 लाख रुपयांचा 34 किलो 400 ग्रॅमॅ गांजा जप्त

पुणे पोलिसांच्या गुणशाखेने जप्त केला

पोलिसांकडून 34 किलो 400 ग्रॅम गांजा पोलिसांनी केला जप्त

पुणे शहरातील विविध परिसरात अवैधरीत्या गांजाची तस्करी करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अटक

अक्षय पोपटराव पाडुळे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव

सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून शहरातील अनेक ठिकाणी आरोपीने अवैधरित्या गांजाची तस्करी केल्याचे गुन्हे यावरती दाखल आहेत

पुण्यातील लोणी काळभोर पोलीस स्टेशन मध्ये सदर आरोपी विरोधात गुन्हा दाखल

Dhule: धुळ्यात मजूराकडून महिलेचा विनयभंग

बांधकामासाठी आलेल्या आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात

विनयभंगाच्या घटनेनंतर संतप्त जमावाकडून राडा

परिसरात काही काळ तणावाचे वातावरण

आरोपीवर विनयभंगसह अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

Nagpur: नागपूर मनपातील राजकीय हालचालींना वेग

स्थायी समिती आणि विषय समित्यांसाठी इच्छुकांची फिल्डिंग

पालिकेची विशेष सभा पुढील आठवड्यात होणार

सभागृहातील संख्याबळानुसार 16 सदस्य स्थायी समितीत भाजपचे 11, काँग्रेसचे 4 तर उर्वरित एक जागा एमआयएमला मिळण्याची शक्यता...

Karnataka Crime: कर्नाटकात कथित 400 कोटी रुपये असलेला ट्रक चोरी प्रकरण

400 कोटींच्या कथित लूट प्रकरणी सातही जण निर्दोष

फिर्यादीने केलेली तक्रार बनावट असल्याचे निष्पन्न

घटनेत गंभीर विसंगती आढळल्याने संशयितांची निर्दोष मुक्तता

स्वतंत्र चौकशीची संशयितांच्या नातेवाईकांची मागणी

Pune: पुण्यात बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई

प्रादेशिक परिवहन विभागाची दंडात्मक कारवाई

नियम मोडणाऱ्या वाहनांचे परवाने निलंबित

साडेसहा हजार परवाने 3 महिन्यांसाठी निलंबित

Nagpur: नागपूर विमानतळावरची सुरक्षा तपासणी करणाऱ्या काही मशीन्स बंद

- सुरक्षा तपासणी मशीन्स बंद असल्याने अनेक प्रवाशांना मनस्ताप

- प्रवाशांची सुरक्षा तपासणी काऊंटर परिसरात गर्दी

- मुंबई आणि दिल्लीला जाणारी विमानं वेळेवर असल्याने प्रवाशांना फटका

- डीजी यात्रा सॅाफ्टवेअर सुद्धा बंद

Washim: वाशिममधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं नामकरण.

वाशिम येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नामकरण आता संत सेवालाल महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वाशिम असे करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने यासंदर्भात अधिकृत शासन निर्णय जारी केला आहे.

या निर्णयानुसार वाशिम येथे १०० विद्यार्थी क्षमतेचे वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्न ४३० खाटांचे रुग्णालय सुरू करण्यास यापूर्वीच मान्यता देण्यात आली होती.

Kishori Pednekar: विरोधी पक्षनेत्या म्हणून किशोरी पेडणेकर यांच्या नावाची घोषणा होणार

त्यामुळे महापौर महिला आणि विरोधी पक्षनेते पद देखील महिलेकडे जाणार असल्याने महापालिकेत महिला राज पहिला मिळणार

विरोधी पक्षनेते पद २००० पासून अस्तित्वात आले असून गेल्या 25 वर्षात पहिल्यांदाच विरोधी पक्ष नेते पदी महिला विराजमान होणार

आत्तापर्यंत काँग्रेसकडे असणारे विरोधी पक्ष नेत्याचे पद प्रथमच शिवसेनेकडे जाणार

तर गणेश खनकर हे सभागृह नेते होणार

Bhandara: भंडारा जिल्ह्यात खासगी वसतिगृहात विद्यार्थ्यांचे हाल

रात्रीचे उरलेले जेवण सकाळी देत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप

वस्तीगृहाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित

प्रशासनाने वस्तीगृहाची तपासणी करावी,विद्यार्थ्यांकडून मागणी

बांग्लादेशी घुसखोरांविरोधात मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

दीड महिन्यात मुंबई आणि परिसरातून 60 बांगलादेशी ताब्यात

बांग्लादेशींना घुसखोरी,रोजगार आणि आसरा देणाऱ्यांवरही कारवाई

वसईतून नुकतीच 350 बनावट रेशनकार्ड जप्त

2025 मध्ये मुंबईतून 1200हून अधिक बांग्लादेशींवर कारवाई केल्याचे तपासात समोर.

Mumbai Police: मुंबई पोलिसांच्या ताफ्यात येणार अत्याधुनिक वाहनांचा ताफा

तब्बल 450हून अधिक नव्या गाड्या दाखल होणार

प्रत्येक पोलिस स्टेशला 2 अत्याधुनिक गाड्या मिळणार

विशेष म्हणजे यात 90 अत्याधुनिक गस्तीच्या मोबाइल व्हॅन असणार

लवकरच मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते होणार लोकार्पण

Babulnath Temple: बाबुलनाथ मंदिर परिसरात जगन्नाथ गिरी साधूंचे वास्तव

बाबुलनाथ मंदिराची जागा सोडण्यासाठी साधूला चार वर्षांची मुदत

उच्च न्यायालयाने दिलेला बेदखलीचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला

बाबुलनाथ मंदिर परिसरात जगन्नाथ गिरी साधू राहतात

सध्या जगन्नाथ गिरी राहत असलेली जागा 1927 मध्ये बाबा रामगिरी महाराज यांना मंदिराने दिली होती

Mumbai Pune Highway: मुंबई-पुणे मार्गावरील वाहतूक कोंडीनंतर एमएसआरडीए अलर्ट

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरिल वाहतूक कोंडीनंतर एमएसआरडीएला जाग....

अपघात टाळण्यासाठी समितीची स्थापना...

समितीत सात जणांचा समावेश...

महामार्गावरील अपघात कसे रोखता येतील आणि सुखकर प्रवास कसा करता येईल याचा समिती अभ्यास करणार...

सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी सचिव सी.पी.जोशी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना...

Nashik: नाशिक महानगरपालिकेची आज विशेष सभा

आज स्थायी समिती सदस्यांची निवड होणार आहे..

यासाठी भाजपकडून नऊ, शिंदेच्या शिवसेनेकडून चार, ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्याकडून एका सदस्याची नियुक्ती होईल...

महापालिकेच्या आर्थिक तिजोरीत स्थायी समिती सदस्यपद महत्वाचे असते ...

भाजपकडून स्थायी समिती सभापती पदासाठी अनेक नगरसेवकांची चढाओढ सुरू आहे

Mulund Metro: मुलुंड दुर्घटना प्रकरणातील 5 आरोपींना पोलीस कोठडी

मुलुंड मेट्रो बांधकाम दुर्घटनेत मुलुंड पोलिसानी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

मिलन रोड बिल्डटेक कंपनी चे प्रोजेक्ट डायरेक्टर हरीश चौहान , प्रोजेक्ट मॅनेजर कुलदीप सपकाळ, डिप्युटी डायरेक्टर सौरभ सिंग, सुपरवायजर प्रशांत भोईर आणि डीबी हिल एलबीजी कंपनी चा प्रोजेक्ट मॅनेजर अवधुत इनामदार यांना अटक करण्यात आली आहे.

Nagpur: भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळविल्या नंतर नागपुरात जल्लोष

नागपुरात लक्ष्मी भवन चौकात होत आहे जलोश...

हातात भारतीय तिरंगा घेऊन जोरदार घोषणजी केली जात आहे...

प्रचंड उत्साह नागुरकरांमध्ये पाहायला मिळत आहे....

Kolhapur: भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर कोल्हापुरात जल्लोष

टी ट्वेंटी सामना दरम्यान भारताने पाकिस्तानचा धुवा उडवल्यानंतर कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात कार्यकर्त्यांचा जल्लोष

कोल्हापूरकरांनी भारताचा तिरंगा ध्वज फडकवत केला जल्लोष

डॉल्बीच्या ठेक्यावरती कार्यकर्त्यांनी डान्स करत केला जल्लोष

Thane: आयोध्या कॉम्प्लेक्स इमारतीचा पाचवा मजल्यावरील स्लॅबचा काही भाग कोसळला

ठाण्यातील किसान नगर 2 वागळे इस्टेट परिसरातील आयोध्या कॉम्प्लेक्स ५ वा माळा वरील एका फ्लॅटमध्ये कुटुंब हॉलमध्ये बसलेले असताना हॉलच्या वरील स्लॅबचा भाग कोसळला सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही..

Mulund Metro: शिंदेंच्या अध्यक्षतेखाली MMRDAची बैठक

मुलुंड मेट्रो बांधकाम स्थळी झालेल्या भीषण अपघातानंतर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एमएमआरडीएची बैठक आज दुपारी २ वाजता होणार आहे.

ही बैठक महत्त्वाची आहे कारण त्यात मोठ्या पायाभूत सुविधांच्या बजेट आणि सुरक्षा सुधारणांची तातडीची गरज लागेल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com