Latest Marathi News Update live : मुंबईत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई

Lokshahi Marathi Live Headlines Updates: आज बुधवार, दिनांक 18 फेब्रुवारी 2026, आजच्या ताज्या बातम्या, पत्रकार परिषद, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर..
Latest Marathi News Update live
Latest Marathi News Update live

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला विद्युत रोषणाई

बीड शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.. याच पार्श्वभूमीवर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे... तसेच छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी व्यवस्थादेखील सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

अजितदादांचा AI व्हिडिओ पोस्ट करणाऱ्यांना राष्ट्रवादीचा कारवाईचा इशारा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या आवाजातील व प्रतिमेतील एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाद्वारे तयार केलेल्या बनावट चित्रफिती व ध्वनिफिती समाजमाध्यमे तसेच विविध इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून प्रसारित होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

पुण्यातील जगदाळे कुटुंबाने घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात जगदाळे कुटुंबातील संतोष जगदाळे यांचा मृत्यू झालेला होता, त्यांच्या पश्चात त्यांची मुलगी असावरी जगदाळे हिला शासकीय नोकरी देण्याचा आश्वासन काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारने दिले होते मात्र अद्यापही तिला पुणे महानगरपालिकेत शासकीय नोकरीत सामावून घेतलेले नव्हते…

नाशिक-पालघर प्रवास आता सुसाट

सिंहस्थातील घोटी-त्र्यंबकेश्वर चौपदरी

महामार्गाला केंद्राकडून मंजुरी

प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार

पर्यटन, उद्योग आणि स्थानिक व्यवसायांना चालना मिळणार

भाजपकडून आणलेल्या प्रस्तावाला मिरा भाईंदर महानगरपालिकेत बहुमताने मंजूर

विरोधात असलेल्या काँग्रेसनेही टिपू सुलतानच्या मुद्द्यावर यूटर्न घेतला.

काँग्रेसने टिपू सुलतान नाव बदलून अब्दुल गफार नावं सुचवलं..

भाजपकडून मीरा रोड येथे असलेल्या टिपू सुलतान चौकाच नाव बदलण्यासाठी प्रस्ताव मंजूर..

टिपू सुलतान नाव बदलून अशफाक उल्ला खान ठेवण्यासाठी प्रस्तावला मंजुरी..

महासभेत चौकाच नाव टिपू सुलतान बदल्यांसाठी आलेल्या प्रस्तावावर काँग्रेसकडून गोंधळ पाहायला मिळालं

Mumbai: मुंबईत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई

कुरार पोलीस ठाण्याचे दोन पोलीस अधिकारी लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना रंगेहात पकडलं

गुन्हा दाखल करण्यासाठी मागितली होती तीन लाखाची लाच

तक्रारदाराकडून यापूर्वी दोन लाख रुपये घेतले

उर्वरित 1 लाख रुपयांची लाच घेताना आज एसीबीने दोघांना रंगेहात पकडले

माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर टीका व पुराव्यांना आमदार निलेश राणे यांचे आव्हान

माजी आमदार वैभव नाईक यांनी मालवण-दांडी येथील मच्छिमार बांधवांना आलेल्या सीआरझेड नोटिशीबाबत केलेल्या आरोपांना आमदार नीलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

वैभव नाईक यांच्या १० वर्षांच्या कार्यकाळात मच्छीमारांना एकही नोटीस आली नाही, या विधानाचा राणेंनी समाचार घेतला.

नाईक यांच्या कार्यकाळात मच्छिमारांना एकूण ३५२ नोटिसा आल्याचा दावा राणेंनी केला असून त्याचे पुरावे देण्याचे आव्हान दिले आहे.

Amravati: शिवजयंतीनिमित्त अमरावतीत मांस विक्री दुकाने बंद

उद्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अमरावती महानगरपालिका हद्दीतील सर्व कत्‍तलखाने व मांस विक्री दुकाने बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाकडून जारी करण्यात आले आहेत.

अमरावती शहरात शिवजयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन होणार असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत

Dhule: धुळ्यातील साक्री शहरात चोरट्यांचा धुमाकूळ.

धुळ्यातील साक्री शहरात अज्ञात चोरट्यांनी रात्री धुमाकूळ घालत चार बंद घरे आणि सुरत हायवेवरील बिअरबार फोडल्याची घटना घडली आहे. या चोऱ्यांमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Pune: पुण्याच्या नवले ब्रिजवर ट्रक पेटला

साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने निघालेला ट्रक अचानक घेतला

नवले ब्रिजवर ट्रक पेटल्याने मोठी वाहतूक कोंडी

घटनास्थळावर अग्निशामक दाखल

गुरुवारी शिवजयंतीनिमित्त अमरावतीत मांस विक्री दुकाने बंद

उद्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अमरावती महानगरपालिका हद्दीतील सर्व कत्‍तलखाने व मांस विक्री दुकाने बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाकडून जारी करण्यात आले आहेत.

अमरावती शहरात शिवजयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन होणार असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत

मंत्री छगन भुजबळांच्या विमानात तांत्रिक बिघाड

राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री बाय कार नाशिककडे रवाना....

धुळे विमानतळावरून सायंकाळी विमान उड्डाण होत नसल्याने...

मंत्री छगन भुजबळ बाय कार रवाना...

धुळे तालुक्यातील बोरकुंड गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यासाठी आले होते मंत्री भुजबळ...

मध्य प्रदेशातील कुनोत राष्ट्रीय उद्याना मादी चित्त्यान दिला ३ बछड्याना जन्म

आतापर्यंत या उद्यानात ९ चित्त्यांनी २७ बछड्यांना जन्म दिली आहे

यापूर्वीही या उद्यानात अनेक मादी चित्त्यांनी बछड्यांना जन्म दिल्याचे व्हिडिओ समोर आले होते

यानंतर आता मादी चित्त्यान दिला ३ बछड्याना जन्म दिला आहे.

Pune: 68 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पुण्यात होणार

या वर्षाची ६८ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ही पुण्यात पार पडणार

१८ मार्च ला होणार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची सुरुवात

वाघोलीत भरणार यंदाच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं मैदान

१८ मार्च ते २२ मार्च दरम्यान पार पडणार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाची घोषणा

Nashik: नाशकात शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती

शिवजयंती निमित्ताने नाशिकच्या अशोक स्तंभ परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे ही छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती सध्या आकर्षण बनते आहे या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेसाठी महाराष्ट्राच्या गड किल्ल्यावर असलेले पाणी आणण्यात आले असून या भव्य दिव्य मूर्तीची आरती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात त्यांच्यासोबत असलेले सेनापती यांच्या वंशज यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे

Kolhapur: कोल्हापुरात नागाळा पार्क परिसरात अज्ञातांकडून 8 ते 10 वाहनांची तोडफोड

कोल्हापूरातील नागाळा पार्क परिसरातील आठ ते दहा चारचाकी वाहनं फोडली

नगरसेवक अर्जुन माने यांच्या चारचाकीसह परिसरातील गाड्यांची तोडफोड

तर एका व्यक्तीवरही दगडाने हल्ला केल्याची माहिती

नागाळा पार्क परिसरात भितीचे वातावर

तोडफोड करून दहशत निर्माण करण्याऱ्या अज्ञाताविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

पोलिसांनी मध्यरात्री अज्ञाताला

ताब्यात घेतल्याची माहिती

Mumbai: मुंबईच्या बोरीवलीत इमारतीच्या लाइट मीटर बॉक्सला आग

शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती

मीटर बॉक्स संपूर्ण जळून खाक

Rohit Pawar : अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न; रोहित पवारांनी व्हिडिओद्वारे मांडले गंभीर मुद्दे

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणाऱ्या अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावर आता नवे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

आमदार Rohit Pawar यांनी या घटनेबाबत एक व्हिडिओ सादर करत स्फोटाचे कारण आणि ब्लॅक बॉक्स जळाल्याच्या दाव्यावर शंका उपस्थित केली आहे

Coastal Road : मुंबई कोस्टल रोडवरील संगीत संकल्पनेला ब्रीच कँडी रहिवाशांचा विरोध

(Coastal Road ) भारतातील पहिला संगीतमय रस्ता मुंबईत झाला असून कोस्टल रोडवरून गाडी जाताच आता ‘जय हो’ ची धून ऐकायला येतेय.

(Coastal Road ) भारतातील पहिला संगीतमय रस्ता मुंबईत झाला असून कोस्टल रोडवरून गाडी जाताच आता ‘जय हो’ ची धून ऐकायला येतेय.

Rohit Pawar : 'अजितदादांचा घातपात...', रोहित पवारांचे गंभीर आरोप

राज्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांच्या कथित विमान अपघातासंदर्भात आमदार Rohit Pawar यांनी अत्यंत गंभीर आरोप करत घातपाताची शक्यता व्यक्त केली आहे.

Rohit Pawar : रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात

Buldhana : बुलढाण्याच्या खामगावात दोन गटात राडा

बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव शहरातील हमीद चौक परिसरात दोन गटात किरकोळ वाद झाल्याची रात्री घटना घडली.

Supriya Sule : खासदार सुप्रिया सुळे आज पुणे दौऱ्यावर

खासदार सुप्रिया सुळे आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुणे पालिका आयुक्त नवलकिशोर राम यांची त्या भेट घेणार आहेत.

Indian Railways : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी खुशखबर! ‘डेस्टिनेशन अलर्ट’ सेवेमुळे स्टेशन सुटण्याची भीती संपली

लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासात प्रवाशांना सर्वात जास्त भेडसावणारी समस्या म्हणजे झोप लागल्यावर आपले स्टेशन चुकण्याची भीती.

विशेषतः रात्रीच्या प्रवासात ही चिंता अधिक वाढते. मात्र आता भारतीय रेल्वे आणि IRCTC यांनी प्रवाशांसाठी मोठी दिलासा देणारी सेवा सुरू केली आहे.

‘डेस्टिनेशन अलर्ट’ आणि ‘वेक-अप अलार्म’ या अत्याधुनिक सुविधेमुळे प्रवाशांना आता निर्धास्त झोप घेता येणार आहे.

Pune : पुणे पालिकेच्या 24 नवनिर्वाचित नगरसेवकांना न्यायालयाचे समन्स

पुणे पालिकेच्या 24 नवनिर्वाचित नगरसेवकांना न्यायालयाकडून समन्स बजावण्यात आले आहे. 24 नगरसेवकाविरुद्ध पराभूत उमेदवाराने या याचिका दाखल केल्या असल्याची माहिती मिळत आहे.

Rohit Pawar : आमदार रोहित पवारांची आज महत्त्वाची पत्रकार परिषद; कोणते मोठे खुलासे करणार? 

(Rohit Pawar) अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले . विमानाचे लँडिंग होत असताना हा अपघात झाला.

या अपघाताने राज्याला मोठा धक्का बसला आहे. या घटनेनं महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.

या विमान अपघातावर अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. यातच आता या घटनेचा तपास करण्यात येत असून अजित पवार यांच्या विमान अपघात तपासात आता खाजगी गुप्तहेराची एन्ट्री झाल्याची माहिती मिळत आहे.

अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास आता खाजगी गुप्तहेर संस्थेकडून केला जाणार आहे.

Indapur : इंदापूर तालुक्यात 21 वर्षीय मुलीचे अपहरण प्रकरण; भिगवणमध्ये हिंदू संघटना आक्रमक 

(Indapur) इंदापूर तालुक्यात 21 वर्षीय मुलीचे अपहरण प्रकरणी आता भिगवणमध्ये हिंदू संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरात 21 वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना घडली होती.

Central Railway : होळी–शिमग्यासाठी मुंबईकरांना दिलासा; मध्य रेल्वेकडून १८६ विशेष गाड्यांची घोषणा

होळी आणि शिमगा सणाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या संख्येने मुंबईकर आपल्या गावी जाण्यासाठी रेल्वे प्रवास करतात.

वाढती गर्दी लक्षात घेता Central Railway ने कोकणासह देशभरात एकूण १८६ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय टळणार असून तिकीट मिळवण्यासाठी होणारी धावपळ कमी होण्याची अपेक्षा आहे.

Muslim:  मुस्लिम समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या जात प्रमाणपत्र प्रक्रियेला ब्रेक

मुस्लिम समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या जात प्रमाणपत्र प्रक्रियेला ब्रेक

काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी सरकारने दिलेल्या आरक्षणानंतर सुरू करण्यात आली होती प्रक्रिया

राज्य शासनाकडून सुधारित शासन निर्णय प्रकाशित

शासन निर्णयात मुस्लिम समाजाला देण्यात आलेले आरक्षण २३ डिसेंबर २०१४ रोजी रद्द झाल्याचा उल्लेख

आरक्षण रद्द झाल्यानंतरही राबवली जाणारी जात प्रमाणपत्र वितरण आणि वैधता प्रक्रियेला शासनाकडून ब्रेक

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com