Latest Marathi News Update live : राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह; किल्ले शिवनेरीवर शिवजन्म सोहळा पार पडणार

Lokshahi Marathi Live Headlines Updates: आज गुरूवार, दिनांक 19 फेब्रुवारी 2026, आजच्या ताज्या बातम्या, पत्रकार परिषद, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर..
Latest Marathi News Update live
Latest Marathi News Update live

Mumbai Metro : मुंबईत मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड 

मुंबईत मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड झाला असून गेल्या 15 मिनिटांपासून मेट्रो गुंदवली स्टेशनवरच थांबून

Washim : वाशिममधील सामूहिक कॉपी प्रकरण; 27 कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल

वाशिममधील सामूहिक कॉपी प्रकरणात आतापर्यंत 27 कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj : 396 वी शिवजयंती उत्साहात; शिवनेरीपासून राज्यभर दुमदुमला शिवगर्जना!

महाराष्ट्राचे आराध्यदैवत Chhatrapati Shivaji Maharaj यांच्या 396 व्या जयंतीनिमित्त राज्यभरात अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळत आहे.

पहाटेपासूनच Shivneri Fort येथे शिवभक्तांची गर्दी उसळली होती. ढोल-ताशांच्या गजरात आणि “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी गड दुमदुमून गेला.

Pune : पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण; एका आरोपीला जामीन मंजूर

पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणी एका आरोपीला जामीन मंजूर झाला आहे. आरोपी अश्फाक मकानदारचा जामीन मंजूर झाला आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj : 396 वी शिवजयंती उत्साहात; शिवनेरीपासून राज्यभर दुमदुमला शिवगर्जना!

SSC Exam : राज्यभरात उद्यापासून दहावीच्या परीक्षेला सुरूवात

राज्यभरात उद्यापासून दहावीच्या परीक्षेला सुरूवात होत आहे. राज्यभरातून 16 लाख 15 हजार 489 विद्यार्थी परीक्षा देणार असून यामध्ये मुंबई विभागातून 3 लाख 48 हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

Chhatrapati Shivaji Maharaj  : राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह; किल्ले शिवनेरीवर शिवजन्म सोहळा पार पडणार

छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तारखेनुसार जयंती आहे. किल्ले शिवनेरीवर शिवजन्म सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com