Latest Marathi News Update live
Latest Marathi News Update live

Latest Marathi News Update live : पुण्यात भाजपा कोअर कमिटीची बैठक

Marathi Live Headlines Updates: आज सोमवार, दिनांक 2 फेब्रुवारी 2026, राज्यातील थंडी, आजच्या ताज्या बातम्या, पत्रकार परिषद, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर..

BJP - Shivsena : भाजप आणि शिवसेनेचे नगरसेवक आज गटनोंदणीसाठी एकत्र कोकण भवनला जाणार

भाजप आणि शिवसेनेचे नगरसेवक आज गटनोंदणीसाठी एकत्र कोकण भवनला जाणार आहेत. दोन्ही पक्ष संयुक्त गटनोंदणी करणार असल्याचे निश्चित झाले आहे.

Sunil Tatkare:  थोड्याच वेळात सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद

थोड्याच वेळात सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद होणार असून विरोधकांच्या टीकेला काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचे असणार आहे.

Mumbai Wilson Gymkhana : विल्सन जिमखान्यासाठी आज गिरगावकरांचा मोर्चा

विल्सन जिमखान्यासाठी आज गिरगावकरांकडून मोर्चा काढण्यात येणार असून जिमखान्याचा वाद प्रलंबित असतानाच जागा जैन संस्थेला देण्यात आल्याने आता संताप व्यक्त केला जात आहे.

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये महापौर, उपमहापौर पदाचे उमेदवार आज ठरणार

अहिल्यानगरमध्ये महापौर, उपमहापौर पदाचे उमेदवार आज ठरणार असून राधाकृष्ण विखे पाटील नगरसेवकांची बैठक घेणार आहे.

Mumbai Coastal Road :  कोस्टल रोडवरील वेगावर आता ब्रेक लागणार; वेगमर्यादा उल्लंघन करणाऱ्यांवर थेट कारवाई

कोस्टल रोडवरील वेगावर आता ब्रेक लागणार असून वेगमर्यादा उल्लंघन करणाऱ्यांवर थेट कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

Mumbai : मुंबईत 36 तासांत 12 अल्पवयीन मुले बेपत्ता

मुंबईत 36 तासांत 12 अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. बाल तस्करीची भीती व्यक्त केली जात असून मुंबई पोलिसांनी हाय अलर्ट जारी करत विशेष शोध मोहीम सुरू केली आहे

BJP : गट नोंदणी करता भाजपाचे नगरसेवक विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल

गट नोंदणी करता भाजपाचे नगरसेवक विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल झाले असून भाजपाचे 102 आणि शिवसेनेचा एक अशी गट नोंदणी करण्यात येणार आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार पक्षाने आज केली गट नोंदणी

विभागीय आयुक्त कार्यालयात चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे केली नोंदणी

तसेच निलेश निकम यांची गटनेते पदी केली नियुक्ती

अजित पवार यांच्या निधनामुळे पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली असून अजित पवार विचारावर पुढे काम करणारअसल्याची भावना व्यक्त केली

Sharad Pawar: शरद पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर

संसदेच्या कामकाजात सहभागी होणार

'विलीनीकरणाच्या चर्चेत जे नव्हते...'

'....त्यांना बैठकीबाबत काय माहीत असणार'

शरद पवारांचं अनौपचारिक चर्चेदरम्यान वक्तव्य

Pimpri-Chinchwad: पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचा बिनविरोध महापौर होणार

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर पार पडणाऱ्या पिंपरी चिंचवड महापौर निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार देणार नाहीये.

खरं तर दिवंगत अजित पवारांनी इथं भाजपला आव्हान दिलं होतं. मात्र ही निवडणूक पार पडली आणि त्यानंतर अजित पवारांचं अपघाती निधन झालं.

हे पाहता राष्ट्रवादी काँग्रेसने महापौर पदाची निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतलाय.

त्यामुळं भाजपकडून महापौर पदासाठी ज्याचा अर्ज दाखल होईल. तो बिनविरोध महापौर होणार, हे आता निश्चित झालंय.

आज दुपारी 3 ते 5 च्या दरम्यान महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे.

पालघरच्या बिडको परिसरात कंपनीला भीषण आग

ड्युरेन या फर्निचर तयार करणाऱ्या कारखान्याला भीषण आग . अग्निशमन दलाची एक गाडी घटनास्थळी दाखल . आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्तीच्या प्रयत्न सुरू . आगीत कोणतेही कामगार अडकले नसल्याची प्राथमिक माहिती . आगीमुळे धुराचे लांबच लांब लोळ .

भंडाऱ्यात काँग्रेसचे ओबीसी जिल्हाध्यक्षांचा भाजपात प्रवेश .

काँग्रेसचे नेते नाना पटोले यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळख असलेले काँग्रेसच्या ओबीसी सेलचे भंडारा जिल्हाध्यक्ष शंकर राऊत यांनी आज भाजपात प्रवेश केला. भाजपा नेते माजी राज्यमंत्री डॉ परिणय फुके यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश भंडाऱ्यात पार पडला. शंकर राऊत माळी समाजाचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. शंकर राऊत यांच्या भाजपा प्रवेशान काँग्रेसला हा मोठा झटका मानला जातो.

रेल्वेच्या ईस्ट आणि वेस्ट कनेक्टिव्हिटी स्पेशल कॉरिडॉर अंतर्गत कनेक्ट केलं जाणार

त्यामधून मोठ्या प्रमाणात मालवाहतूक वाढवली जाण्याचा प्रयत्न असणार आहे

238 एसी लोकल ट्रेन मुंबईकरांच्या 2029 पर्यंत सेवेत आणल्या जाणार आहेत

जून महिन्यापर्यंत पंधरा डब्याच्या लोकल धावण्यासाठी फलाट तयार करण्यात येणार आहेत

येत्या मार्च महिन्यापर्यंत दोन सेफ्टी डोअर च्या लोकल ट्रायल बेसिसवर धावल्या जाणार.

महाराष्ट्रात 132 अमृत भारत स्टेशनचे निर्मिती केली जाणार आहे

कोकण रेल्वेच्या ट्रॅक्टर दुहेरीकरण प्रगतीपथावर लवकरच याबाबत अप्रुवल मिळाल्यानंतर कोकण रेल्वेची मार्गिका दुहेरी करण्यात येणार आहे...

Mumbai Central: मुंबई सेंट्रल परिसरातील एका इमारतीमध्ये भीषण आग

अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल...

आगीचं कारण अद्याप स्पष्ट...

वर्ध्यात लाडकी बहीण योजनेची फेर तपासणी करण्याला अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा नकार

वर्ध्यात लाडकी बहीण योजनेची फेर तपासणी करण्याला अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा नकार

योग्य मोबदला मिळत नसल्याने ईकेवायसी फेरतपासणी करण्याला विरोध

अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर अनेक कामांचा बोझा, त्यात लाडकी बहीण योजनेची फेरतपासणीने वाढतोय ताण

अंगणवाडीतील मुलांना शिकवायचे की व्यतिरिक्त कामे करायची अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पडलाय प्रश्न

फेर तपासणी दरम्यान ग्रामीण भागात भांडणे होण्याची अंगणवाडी कर्मचाऱ्यांना भीती

योग्य मोबदला द्या, सुरक्षा द्या काळ्या फिती लावत आयटक संघटनेच्या नेतृत्वात वर्धात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) ना दिले निवेदन

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांने काढला अजित पवारांचा टॅटू..

कार्यकर्त्यांने काढला अजित पवारांचा टॅटू; टॅटू पाहताच सुनेत्रा पवार झाल्या भावुक...

अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सहयोग मध्ये येतायेत सांत्वन भेटीसाठी...

भेटीसाठी आलेल्या कार्यकर्त्यांने टॅटू सुनेत्रा पवारांसह जय पवारांना दाखवताच जय पवारांसह सुनेत्रा पवार झाल्या भावुक..

सिल्लोड तालुक्यात मंत्री पंकजा मुंडे यांची सभा संपन्न

सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आज मंत्री पंकजा मुंडे यांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी उपस्थिताना पक्षाची भूमिका स्पष्ट केली. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

भिवंडी शहराला पंधरा तास राहणार पाणीपुरवठा बंद; नागरिकांनी जपून पाणी वापरण्याचे आव्हान

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरीकांना कळवण्यांत येते की, जुन्या भिवंडी शहराला वन्हाळा जलकुंभ येथुन पाणी पुरवठा करणारी वृहन्मुंबई महानगरपालिकेची के.बी. ग्रीज, गौतम कंपाऊंड येथे मुख्य जलवाहिनी रस्त्याच्या कामामुळे नादुरुस्त झालेली आहे.

मिरा- भाईंदरमध्ये चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला आरोपी फरार

भाईंदर पूर्वेतील नवघर पोलिस ठाण्यात आज सकाळी खळबळजनक घटना घडली. चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला आरोपी अब्दुल मनियार हा नवघर पोलिस ठाण्याच्या लॉकअपमधून फरार झाला होता.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास लॉकअपची सफाई सुरू असताना आरोपीने संधी साधली. लॉकअप गार्डला चकवा देत तो लॉकअपमधून बाहेर पडून पळून गेला. या घटनेनंतर पोलिस प्रशासनात एकच खळबळ उडाली होती.

Mumbai-Goa Highaway: मुंबई-गोवा महामार्गावर अपघात, पादचारी महिलेला कारची धडक

मुंबई-गोवा महामार्गावर पिंगुळी- मोरजकरवाडी येथे सावंतवाडीच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या कारची जोराची धडक बसून पादचारी आशा सोनू धुरी (65, रा. पिंगुळी- धुरीटेंबनगर) या जागीच ठार झाली. आशा धुरी या नेहमीप्रमाणे चालत घरकामाला जात होत्या. महामार्गावर पिंगुळी- मोरजकरवाडी येथे मुंबईहून दोडामार्ग-सावंतवाडीच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या कारची पादचारी धुरी यांना जोराची धडक बसली. यात त्या जागीच ठार झाल्या.

Pune: पुण्यात भाजपा कोअर कमिटीची बैठक

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात बैठक

पुणे महापालिकेच्या महापौर पदासाठीच्या नावांवर चर्चा

उद्या भरला जाणार महापौर, उपमहापौर पदासाठी भाजपा उमेदवारांचा अर्ज

बैठकीला चव्हाण यांच्यासह मंत्री चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, सभागृह नेते गणेश बिडकर, शहराध्यक्ष धीरज घाटे यांचेसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित

महापौर पदी कोणाची वर्णी लागणार अद्याप सस्पेन्स कायम

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com