Latest Marathi News Update live : कोल्हापुरात शिवसेनेचा महापौर पदावर दावा

Marathi Live Headlines Updates: आज बुधवार, दिनांक 21 जानेवारी 2026, राज्यातील थंडी, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर..
Latest Marathi News Update live
Latest Marathi News Update live

Kolhapur: कोल्हापुरात शिवसेनेचा महापौर पदावर दावा

आमदार राजेश क्षीरसागरांनी लावले बॅनर

बाळसाहेबांची स्वप्नपूर्ती,शिवसेनेचा महापौर होणार

अशा आशयाचे संपूर्ण शहरात लावले फलक

रवी राणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला

नंदनवन येथे एकनाथ शिंदे यांची भेट घेणार

भेटीचे कारण अद्याप अस्पष्ट

प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणाचा मान मंत्री भरत गोगावले यांना

अलिबाग इथं मुख्य ध्वजारोहण भरत गोगावले यांच्या हस्ते होणार

२६ जानेवारी रोजी मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण

यापूर्वी मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते होत होते शासकीय ध्वजारोहण

Kalyan: कल्याण शीळ रोड सोनारपाडा परीसरात CNG गाडीने घेतला पेट

गाडी गॅरेजवर कामासाठी उभी असताना लागली आग,

सुदैवाने जीवितहानी नाही

Bhiwandi: भिवंडीत परोपकार संस्थे तर्फे गरजू 250 कुटुंबियांना अन्नधान्य किट वितरण

भिवंडीत सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या परोपकारी संस्थेतर्फे नुकताच शहरातील 250 गरजू कुटुंबियांना मोफत अन्नधान्य किटचे वितरण करण्यात आले.पद्मानगर येथील पद्मशाली समाज सभागृह येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात संस्था भिवंडी अध्यक्ष मनोज दुधानी,राजू गाजेगी,रमेश मुंधड़ा,नारायण बाहेती,पवन बागड़ी,ओमप्रकाश झंवर,ओम सोमाणी,संजय कोठारी,द्वारका आसवा,मुरली टपरिया व भिवंडी महिला माहेश्वरी समाज अध्यक्षा बबीता आसवा आदी उपस्थित होते.

मकर संक्रांतीच्या निमित्त आयोजित या कार्यक्रमात प्रत्येक कुटुंबियांना दहा किलो अन्नधान्य किट वितरित करण्यात आले ज्यामध्ये तांदूळ,गहू,डाळ,तेल,मसाला,चहा पावडर,साखर आदी साहित्याचा समावेश होता.परोपकारी संस्थेच्या या सेवकार्याची उपस्थित मान्यवरांनी प्रशंसा केली आहे.

मोहोळ तालुक्यातील पेनूर जिल्हा परिषद गटात भाजपला शिवसेना शिंदे गटाचे आव्हान

सर्व पक्षीय पाठिंबा असणारे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख चरणराज चवरे समोर माजी आमदार राजन पाटलांचे निष्ठावंत कार्यकर्ते रामदास चवरे यांच्यात असणार थेट लढत

शिवसेना शिंदे आणि भाजपातील चवरेंनी आज एकमेकांविरोधात उमेदवारी अर्ज भरताना केल जोरदार शक्तीप्रदर्शन

मोहोळ तालुक्यात 6 जिल्हा परिषद गट आणि 12 पंचायत समिती गणात आमच्याच जागा निवडून येण्याचा दोन्ही गटाने व्यक्त केला विश्वास

या निवडणुकीत पालकमंत्री जयकुमार गोरे पेनूर गटात घेणार आहेत जाहीर सभा

त्यामुळे मोहोळ तालुक्यात भाजपचे माजी आमदार राजन पाटील विरुद्ध राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील असा सामना पाहायला मिळणार

छत्रपती संभाजीनगरमध्ये वेगात जाणारी कार डिव्हायडरला धडकून पलटी

छत्रपती संभाजीनगर-छत्रपती संभाजी नगर शहरातील गार्डन समोर आज दुपारच्या सुमारास एक कार मिल कॉर्नर कडून बाबा पेट्रोल पंप च्या दिशेने सुसाट वेगाने जात असताना नियंत्रण सुटल्यामुळे दिवाळीला धडकून पलटी झाली या गाडीच्या दोन्ही एयर बॅगा उघडल्या यामध्ये या कारमध्ये तीन जण होते त्यांना किरकोळ दुखापत झाली यावेळी रस्त्यावर मोठी ट्रॅफिक जाम झाली होती

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन

महापालिका निवडणुकीत भाजपच्या दणदणीत विजयाबद्दल अभिनंदन केले

स्वित्झर्लंडमधील दावोस येथील इंडियन पॅव्हेलियनमध्ये भेटीत केले अभिनंदन

Pune: पुणे जिल्ह्यात भाजप शिवसेना युती तुटली

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मध्ये शिवसेना स्वतंत्र लढणार

सेनेकडून अनेक ठिकाणी देण्यात आले AB फॉर्म

महापालिकेपाठोपाठ जिल्हा परिषदेत ही भाजपने शेवटपर्यंत सेनेला ठेवले झुलवत

भाजपकडून प्रतिसाद न असल्याने शिवसेनेकडून एकट्याने लढण्याची तयारी

कापस, डाळी व धान्याची माळ घालून उमेदवारी अर्ज दाखल

गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात शेतकऱ्याची मोठा प्रमाणात दुरावस्था झाली असून त्यात अवकाळी, गारपीठ, वाढती महागाई यामुळे शेतकरी मेटा कुटिल आला असून त्यात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे कुणाचे लक्ष नसल्याने मी शेतकऱ्याचे प्रश्न सोडविण्यासाठी निवडणुकी मध्ये अर्ज दाखल केला असल्याचे प्रहार संघटनेचे अंकुर जैवल यांनी सांगितले आहे

Sunita Williams : सुनीता विलियम्स NASA मधून निवृत्त, अंतराळ प्रवासाचा गौरवशाली कारकीर्द संपली

NASA ची अनुभवी आणि लोकप्रिय अंतराळवीर सुनीता विलियम्स यांनी तब्बल २७ वर्षांच्या प्रदीर्घ, यशस्वी आणि ऐतिहासिक सेवेनंतर निवृत्ती जाहीर केली आहे. त्यांची निवृत्ती २७ डिसेंबर २०२५ पासून प्रभावी झाली असून, यासह मानवी अंतराळ उड्डाणाच्या इतिहासातील एका महत्त्वपूर्ण अध्यायाचा शेवट झाला आहे. मूळ भारतीय वंशाच्या असलेल्या सुनीता विलियम्स यांच्याविषयी भारतात विशेष आपुलकी असून, त्यांच्या कामगिरीचा अभिमान देशवासीयांना नेहमीच राहिला आहे.

ShivSena-NCP Name-Symbol Hearing : शिवसेना- राष्ट्रवादी पक्षाची सुनावणी लांबणीवर, पुढील सुनावणी शुक्रवारी होणार

(Shivsena - NCP) शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात पार पडणार होती. गेल्या अनेक वर्षांपासून हे प्रकरण प्रलंबित असून आज यावर सुनावणी होणार होती.मात्र आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी पुन्हा लांबणीवर गेल्याची माहिती मिळत आहे. सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी आता शुक्रवारी होणार आहे.पक्ष आणि चिन्हाची पुढील सुनावणी आता शुक्रवारी सकाळी 11 वाजता होणार आहे. त्यामुळे आता शुक्रवारी होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Sanjay Raut : "दाओसमध्ये देशभरातील मुख्यमंत्र्यांची पिकनीक सुरू"; संजय राऊत यांची टीका

(Sanjay Raut) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या जागतिक आर्थिक परिषदेसाठी दावोस दौऱ्यावर आहेत. या दावोस दौऱ्यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांची प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, "देशभरातील मुख्यमंत्र्यांची पिकनीक दावोसला सुरू आहे. मी महाराष्ट्राच्या म्हणत नाही देशाच्या. मुख्यमंत्र्यांची पिकनीक बर्फात सुरू आहे. ती संपली की मुख्यमंत्री महापौरच्या निवडणुकीत लक्ष घालतील."

Mumbai Metro : मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी! दहिसर–भाईंदर मेट्रो-9 चा मार्ग मोकळा

मुंबईकरांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. दहिसर ते मीरा-भाईंदरदरम्यान धावणाऱ्या मेट्रो-9 मार्गिकेच्या उद्घाटनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. मुंबईतील दहिसर ते मीरा-भाईंदर मेट्रो-9 मार्गिकेच्या दहिसर ते काशिगाव या पहिल्या टप्प्यासाठी अंतिम सीएमआरएस (Commissioner of Metro Rail Safety) प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे आता या मेट्रो मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याच्या संचालनाला कोणताही अडथळा राहिलेला नाही.

Karnataka Maharashtra : 'महाराष्ट्राला खटला दाखल करण्याचा अधिकार नाही',महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादावर सिद्धरामय्यांचं वक्तव्य..

कर्नाटक–महाराष्ट्र सीमा वाद पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. आज बुधवार, २१ तारखेला सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या महत्त्वपूर्ण सुनावणीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी महाराष्ट्राच्या भूमिकेवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. “महाराष्ट्राला सीमा वादाचा खटला दाखल करण्याचा अधिकारच नाही,” असे ठाम विधान त्यांनी करत महाराष्ट्राला जणू अप्रत्यक्ष इशाराच दिला आहे. कर्नाटक–महाराष्ट्र सीमा प्रश्न हा गेल्या अनेक दशकांपासून प्रलंबित असून, २००४ साली महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात अधिकृत अर्ज दाखल केला होता. या अर्जामध्ये मराठी भाषिक बहुल असलेल्या बेळगावसह एकूण ८६५ सीमावर्ती गावांचा महाराष्ट्रात समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे. तब्बल २० वर्षांनंतर या याचिकेवर सुनावणी होत असल्याने या प्रकरणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

Navi Mumbai Airport : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा ऐतिहासिक टप्पा; १९ दिवसांत १ लाख प्रवाशांची नोंद

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने कार्यान्वयनाच्या अवघ्या काही दिवसांतच एक महत्त्वाचा आणि ऐतिहासिक टप्पा पार केला आहे. गेल्या १९ दिवसांत या विमानतळावरून तब्बल १ लाख प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद झाली असून, एकूण ७३४ विमानांचे यशस्वी टेकऑफ आणि लँडिंग झाले आहेत. या आकडेवारीमुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील वाढता ताण कमी करण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने सुरुवातीपासूनच आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी हा विमानतळ एक महत्त्वाचा पर्याय ठरत असून, नवी मुंबई, पनवेल, रायगड, ठाणे आणि मुंबईच्या उपनगरातील प्रवाशांना याचा मोठा फायदा होत आहे.

Uddhav Thackeray : ठाकरेंच्या शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक आज गट नोंदणीसाठी कोकण भवनात जाणार

(Uddhav Thackeray) महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि आता महापौर कुणाचा बसणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच ठाकरेंच्या शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक आज गट नोंदणीसाठी कोकण भवनात जाणार असल्याची माहिती मिळत आहे. ठाकरे सेनेचे सर्व 65 नगरसेवक गट नोंदणीसाठी कोकण आयुक्त कार्यालय बेलापूर येथे जाणार असून मुंबई महापालिकेसाठी गटाची नोंदणी केली जाणार आहे. सर्व नगरसेवक दादर मधील शिवसेना भवन येथे सकाळी दहा वाजता एकत्र जमतील यानंतर सर्व नवनिर्वाचित नगरसेवक एकत्र जमल्यानंतर कोकण भवन येथे जाण्यास निघतील. सर्व नगरसेवकांना एकाच बसमधून घेऊन जाण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

Pune : पुणे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी गर्दी; उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज शेवटचा दिवस

( Pune ) जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे. राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समिती यांच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली असून राज्यात 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून रोजी 7 फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता पुणे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी गर्दी पाहायला मिळत आहे. बंडखोरी टाळण्यासाठी कुठल्याही पक्षांकडून अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली नाही आहे. आघाडी युतीवर पुण्यात संभ्रम कायम तर काँग्रेस वंचितच्या आघाडीची घोषणा झाली असून भाजप शिवसेना युतीची चर्चा अद्याप अपूर्ण असून शिवसेनेने भाजपाकडे यादी पाठवली असल्याची माहिती मिळत आहे. वंचित आणि काँग्रेसने आघाडीची घोषणा करून जिल्हा परिषदेची तयारी सुरू केली आहे.

1085k Mumbai Digital Scams : मुंबईत डिजिटल स्कॅमचं प्रमाण वाढलं; 2025 मध्ये मोठ्या प्रमाणात फसवणुकीचे गुन्हे दाखल

(Mumbai Digital Scams) मुंबईत डिजिटल स्कॅमचं प्रमाण वाढल्याचे पाहायला मिळत आहे. 2025 मध्ये मोठ्या प्रमाणात फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 2025 मध्ये पहिल्या सहा महिन्यात एकूण 2188 सायबर गुन्हे नोंदवले गेल्याची माहिती मिळत आहे. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेअर मार्केट व डिजिटल अरेस्टबाबत फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. 2025च्या पहिल्या सहा महिन्यात म्हणजे 2188 प्रकरणे नोंदवली गेली असून 2024 मध्ये एकूण 5,087 प्रकरणेची नोंद झाली असल्याची माहिती मिळत आहे.

Devendra Fadnavis : दावोस दौऱ्यात महाराष्ट्राला गुंतवणुकीची मोठी गती; मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया


स्वित्झर्लंडमधील दावोस येथे पार पडलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राने मोठी झेप घेतली असून, विविध आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत कंपन्यांसोबत महत्त्वपूर्ण गुंतवणूक करार करण्यात आले आहेत. या करारांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की, या करारांमुळे राज्याच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा मिळणार असून मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार आहे.

Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडेंकडे नवी जबाबदारी; केरळ विधानसभा निवडणुकीचे प्रमुख म्हणून नियुक्ती

(Vinod Tawde) भाजप नेते विनोद तावडेंकडे नवी जबाबदारी देण्यात आली आहे. विनोद तावडे यांची केरळ विधानसभा निवडणुकीचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी विनोद तावडे यांची नियुक्ती केली असून बिहारनंतर आता तावडेंकडे केरळ जिंकण्याची जबाबदारी देण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. यासोबतच केंद्रीय राज्यमंत्री शोभा करंदलाजे सह-प्रभारी असणार आहेत.

Air Pollution : हवा प्रदूषणावर कारवाई अपुरी; उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा

मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषणाच्या मुद्द्यावर मुंबई महानगरपालिकेला (BMC) उच्च न्यायालयाकडून कडक शब्दांत ताशेरे ओढण्यात आले आहेत. हवा प्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून त्यामुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता ‘मध्यम’ (Moderate) स्तरावर असल्याचा दावा महापालिकेने उच्च न्यायालयात केला होता. मात्र हा दावा ऐकल्यानंतर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत, “आम्हाला मुंबईतील हवेची गुणवत्ता मध्यम दर्जाची नको आहे,” अशा शब्दांत महापालिकेला सुनावले. मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर हवेच्या प्रदूषणासंदर्भातील जनहित याचिकेवर सुनावणी सुरू होती. यावेळी महापालिकेने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बांधकाम प्रकल्प, औद्योगिक घटक आणि कचरा जाळणाऱ्यांवर करण्यात आलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल सादर केला. या अहवालात दंडात्मक कारवाई, नोटिसा आणि कामे थांबवण्याचे आदेश दिल्याचा उल्लेख करण्यात आला होता.

OBC Reservation : स्थानिक स्वराज्य संस्था मधील ओबीसी आरक्षण संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची सुनावणी उद्या सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, याचा थेट परिणाम आगामी महापालिका, नगरपरिषद आणि जिल्हा परिषद निवडणुकांवर होण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण लागू करण्यासाठी राज्य सरकारने बठीया आयोगाची (Bhatia Commission) स्थापना केली होती. या आयोगाने जमा केलेल्या इंपेरिकल डेटाच्या आधारे राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणाची टक्केवारी कमी करण्यात आली. आयोगाच्या अहवालानुसार काही ठिकाणी ओबीसी लोकसंख्या कमी असल्याचा दावा करण्यात आला असून, त्यामुळे आरक्षणाचे प्रमाण घटवण्यात आले आहे.

Shivsena : शिवसेना पक्ष धनुष्यबाण चिन्हाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

(Shivsena) शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्हावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी अंतिम सुनावणी सुरू होणार आहे. सलग दोन दिवस युक्तिवाद ऐकून घेतले जाणार आहेत. सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्या. जॉयमल्ल्या बागची यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी होणार आहे. नोव्हेंबरमध्ये झालेल्या सुनावणीदरम्यानच न्यायालयाने अंतिम सुनावणीचा संकेत दिला होता. त्यामुळे आता या प्रकरणावर लवकरच निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी आणि घड्याळाबाबत देखील आज युक्तिवाद ऐकून घेतला जाणार आहे.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत मोठा निर्णय; ई-केवायसी चुका दुरुस्तीसाठी प्रत्यक्ष पडताळणीचे आदेश

लाडकी बहीण योजनेसंदर्भात (Ladki Bahin Yojana) राज्य सरकारने प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेत झालेल्या चुकांमुळे अनेक महिलांना योजनेचा लाभ मिळू शकलेला नाही. या पार्श्वभूमीवर महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना थेट प्रत्यक्ष पडताळणी करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी तसेच त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्याच्या उद्देशाने राबवण्यात येत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थी महिलांना ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ई-केवायसी करण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र अनेक महिलांनी ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडल्यामुळे त्यांची प्रक्रिया अपूर्ण राहिली. परिणामी, अनेक पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळालेला नाही.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com