Latest Marathi News Update live : महापालिकांच्या महापौर पदासाठी आरक्षण सोडत जाहीर

Marathi Live Headlines Updates: आज गुरूवार, दिनांक 22 जानेवारी 2026, राज्यातील थंडी, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर..
Latest Marathi News Update live
Latest Marathi News Update live

Ganesh Jayanti:  देशभरात आज माघी गणेश जयंतीचा उत्साह

आज माघी गणेश जयंती आहे. ही गणेश जयंती माघ महिन्यात साजरी केली जाते. देशभरात माघी गणेश जयंती साजरी केली जाणार आहे. माघी गणेश जयंती 22 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजून 28 मिनिटांनी सुरु होईल ते दुपारी 01 वाजून 42 मिनिटांपर्यंत असेल.

Maharashtra : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या महापौर पदासाठी आज आरक्षण सोडत

आज राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौर पदासाठी आरक्षण सोडत काढली जाणार आहे. नगरविकास विभागाकडून महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत सकाळी 11 वाजता मंत्रालयात काढली जाणार आहे.

KEM रुग्णालयाच्या 100 व्या वर्धापन दिन

KEM रुग्णालयाच्या 100 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमला एकनाथ शिंदे आणि अरविंद सावंत अनुपस्थित असून मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला सुरुवात झाली.

Mumbai : मुंबईत 7 आणि 8 तारखेला 'नवे क्षितिज’ 2 दिवसीय व्याख्यानमाला

मुंबईत 7 आणि 8 तारखेला 'नवे क्षितिज’ 2 दिवसीय व्याख्यानमाला असणार असून सरसंघचालक डॉ. मोहन भागवत संबोधित करणार आहेत.

Dharashiv : धाराशिवमध्ये अज्ञातांकडून तीन एसटी बसची तोडफोड

धाराशिवमध्ये अज्ञातांकडून तीन एसटी बसची तोडफोड करण्यात आली असून तोडफोडीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

Sanjay Raut : संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला 

कल्याण डोंबिवली महापालिकेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मनसेने पाठिंबा दिला आहे. यातच आता संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला गेले आहेत.

Jalgaon : पहिली महिला ओबीसी महापौर जळगावमध्ये होणार

Mumbai : मुंबईतल्या आरक्षणावर ठाकरेंच्या शिवसेनेचा आक्षेप 

महापालिकांच्या महापौर पदासाठी आरक्षण सोडत जाहीर

महापालिकांच्या महापौर पदासाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली.

Mumbai : मुंबई महापालिकेसाठी खुल्या प्रवर्गातील महिला महापौर

Pune : पुणे महानगर पालिकेसाठी महापौरपद खुला महिला प्रवर्गासाठी राखीव

पुणे महानगर पालिकेसाठी महापौरपद खुला महिला प्रवर्गासाठी राखीव असणार असून पुण्याचा महापौर खुल्या प्रवर्गासाचा असणार आहे. रंजना टिळेकर, मंजुषा नागपुरे, मानसी देशपांडे, रोहिणी चिमटे यांचे नाव चर्चेत असल्याची माहिती मिळत आहे.

BMC Mayor Reservation : BMC आरक्षण सोडत वादात; ठाकरे गट आक्रमक

राज्यातील 29 महापालिकांसाठी महापौरपदाचे आरक्षण निश्चित झाले असून, यावेळी महिलांना मोठे प्रतिनिधित्व मिळाले आहे. एकूण 15 महापालिकांमध्ये महिला महापौर असतील, तर उर्वरित ठिकाणी खुल्या प्रवर्गाला संधी देण्यात आली आहे. ओबीसी महिलांसाठी 4, तर सर्वसाधारण महिलांसाठी 9 महापालिका राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

ShivSena : खरी शिवसेना कुणाची? बाळासाहेबांच्या जयंतीदिनी अंतिम लढाई

खरी शिवसेना कुणाची, धनुष्यबाण हे पक्षचिन्ह कुणाकडे राहणार, यावर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटामधील सुरू असलेली कायदेशीर लढाई आता निर्णायक वळणावर आली आहे. सुप्रीम कोर्टात सुरू असलेलं हे प्रकरण अंतिम टप्प्यात असलं, तरी सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. आता ही अत्यंत महत्त्वाची अंतिम सुनावणी २३ जानेवारी रोजी, म्हणजेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी, सरन्यायाधीश न्या. सूर्यकांत आणि न्या. जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर सुरू होणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com