Latest Marathi News Update live : भिवंडीत पाच दिवस रंगणार आगरी महोत्सव;उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थित राहणार

Marathi Live Headlines Updates: आज शुक्रवार, दिनांक 23 जानेवारी 2026, राज्यातील थंडी, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर..
Latest Marathi News Update live
Latest Marathi News Update live

Balasaheb Thackeray: आज हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची जन्मशताब्दी

आज हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची जन्मशताब्दी असून विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे.

Nagpur : नागपूरसह विदर्भातील ध्वनी प्रदूषणावर नागपूर खंडपीठाने व्यक्त केली चिंता

नागपूरसह विदर्भातील ध्वनी प्रदूषणावर नागपूर खंडपीठाने चिंता व्यक्त केली असून ध्वनीप्रदूषणासंदर्भात नागपूर खंडपीठाकडून याचिका दाखल करण्यात आली आहे.

Pandharpur: पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीच्या विवाहाची लगीनघाई

वसंतपंचमीच्या निमित्ताने पंढरपुरात विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा संपन्न होत आहे. यासाठी संपूर्ण मंदिर हे फुलांनी सजवण्यात आले आहे.

Accident : जळगावच्या मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कारचा अपघात

जळगावच्या मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कारचा अपघात झाला असून चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची माहिती आहे.

Eknath Shinde : थोड्याच वेळात एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद

एकनाथ शिंदे यांची आज पत्रकार परिषद असून काय बोलणार याकडे लक्ष

महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळ यांना मोठा दिलासा

एसीबीनंतर आता ईडीच्या केसमध्येही भुजबळांची निर्दोष मुक्तता.

छगन भुजबळ आणि इतरानी निर्दोष मुक्ततेसाठी केलेला अर्ज कोर्टाने मंजूर केला.

प्रेडिकेट ऑफेन्स नसेल तर ईडीची केसही उभी राहू शकत नाही या आधारावर निर्दोष मुक्तता.

विशेष कोर्टाचे न्यायाधीश सत्यनारायण नवंदर यांच्या कोर्टाने निर्दोष मुक्तता केली.

वायू प्रदूषणावर 27 जानेवारीला पुन्हा होणार सुनावणी

- नवी मुंबई मनपा आयुक्तांना एक संधी

- मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांनी नवी मुंबई आयुक्त कैलास शिंदे यांचा पगार रोखला होता

- दुपारी पुन्हा सुनावणी झाल्यानंतर न्यायाधीशांनी मवाळ भूमिका घेत आता फक्त पगार रोखण्याचा इशारा देत आहोत..असे म्हणले

- पुढील सुनावणीमध्ये सर्व मॉनिटरिंग सिस्टिम आणि त्याचा डेटा प्रतिज्ञापत्रावर घेऊन यावे असे आदेश न्यायालयाने दिले

वरवडे पंचायत समितीचे भाजपाचे उमेदवार सोनू सावंत बिनविरोध

सिंधुदुर्गात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्याआधी ठाकरे गटाला अजून एक धक्का बसलाय. वरवडे पंचायत समितीचे भाजपाचे उमेदवार सोनू सावंत हे बिनविरोध निवडणून आले आहेत. ठाकरे गटाचे उमेदवार सुधीर सावंत व मनसेचे शांताराम सादये यांनी अर्ज मागे घेतला असून सोनू सावंत हे एकमेव उमेदवार शिल्लक राहिल्याने त्यांचा विजय निश्चित झाला आहे.

Mumbai-Pune Express: मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवरील गव्हजे परिसरात भीषण अपघात

मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवरील गहूंजे परिसरात भीषण अपघात झाला आहे.

मर्सिडीज कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला जोरदार धडक दिल्याने कारमधील चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून, सर्व जखमींना उपचारासाठी सोमाटणे फाटा येथील पवना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातामुळे काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.

Latest Marathi News : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आरोपींना 2 दिवसांची पोलिस कोठडी

महाड न्यायालयाचा निर्णाय

आज शिवसेनेचे 8 तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 5 आरोपी पोलिसांसमोर हजर झाले

रविवारी पुन्हा न्यायालयासमोर हजर करणार

Panvel: तीन वर्षीय दिव्यांग चिमुकलीला बेवारस सोडून पालकांचे पलायन

पनवेल रेल्वे स्थानकावर माणुसकीला काळीमा फासणारी घटना

तीन वर्षीय दिव्यांग चिमुकलीला बेवारस सोडून पालकांचे पलायन

घटनेनंतर पालकांवर गुन्हा दाखल

आई वडिलांनी स्टेशनवर सोडले

घटनेनंतर एकच खळबळ

भिवंडी प्रांत कार्यालयावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन

मागील 11 वर्षांपासून भाजप प्रणित सरकारच्या धोरणांनी ग्रामीण व शहरी भागातील सामान्य जनतेला देशोधडीला लावल्याच्या आरोपाखाली मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने विविध मागण्यांसाठी भिवंडी प्रांत कार्यालयावर ठिय्या आंदोलन पुकारले आहे.दुर्गम भागातील गोर गरिबांसाठी वनपट्टे,पाणीप्रश्न,घरकुल योजना,वाढते वीजबिल, कामगारांचे प्रश्न,राशन,रोजगार हमी अशा विविध समस्या सोडवण्यासाठी आंदोलन सुरू असून मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com