Latest Marathi News Update live : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! जानेवारीचे 1500 रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात

Lokshahi Marathi Live Headlines Updates: आज मंगळवार, दिनांक 24 फेब्रुवारी 2026, आजच्या ताज्या बातम्या, पत्रकार परिषद, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर..
Latest Marathi News Update live
Latest Marathi News Update live

Supriya Sule : सुप्रिया सुळे यांना मोदी सरकारकडून महत्त्वाची जबाबदारी; सिंगापूर दौऱ्यात खासदारांचा नेतृत्व!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना केंद्र सरकारकडून पुन्हा एकदा महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

सिंगापूर (Singapore) देशासोबत होणाऱ्या व्यावसायिक चर्चांमध्ये सहभागी होण्यासाठी खासदारांचा एक विशेष गट नेमण्यात आला असून, या गटाचे नेतृत्व सुप्रिया सुळे करणार आहेत.

Anil Ambani : अनिल अंबानींना मोठा कायदेशीर धक्का! मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती उठवली

उद्योगपती अनिल अंबानी यांच्यासाठी सोमवारी मोठा कायदेशीर धक्का बसला.

मुंबई उच्च न्यायालयाने बँकांना फसवणुकीच्या आरोपांवर कारवाई करण्यापासून रोखणारी अंतरिम स्थगिती रद्द केली आहे.

या निर्णयामुळे बँकांना त्यांच्या कंपन्यांची खाती ‘फसवी’ म्हणून वर्गीकृत करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

President Droupadi Murmu at Shegaon : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू शेगावात! संत गजानन महाराजांचे दर्शन, कडक बंदोबस्त

Droupadi Murmu द्रौपदी मुर्मू यांच्या शेगाव भेटीमुळे Shegaon शेगाव शहरात उत्साहासोबतच कडक सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली आहे. 25 फेब्रुवारी रोजी त्या बुलढाणा जिल्ह्यातील महाआरोग्य मेळाव्याचे उद्घाटन करणार आहेत.

Vijay Wadettiwar : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीची चर्चा करा! विधानसभेत विजय वडेट्टीवार आक्रमक

महाराष्ट्राच्या राजकारणात शेतकरी प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत. विजय वडेट्टीवार यांनी महाराष्ट्र विधानमंडळ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यातील शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीवर तातडीने चर्चा करण्याची जोरदार मागणी केली.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! जानेवारीचे 1500 रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात

राज्यातील लाखो महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत जानेवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com