Latest Marathi News Update live : राज्यसभा निवडणुकीबाबत काँग्रेसची आज बैठक
Lokshahi Marathi Live Headlines Updates: आज गुरूवार, दिनांक 26 फेब्रुवारी 2026, आजच्या ताज्या बातम्या, पत्रकार परिषद, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर..
Raigad : रायगड जिल्हा परिषदेचा तिढा सुटेना; रायगड जिल्हा परिषदेबाबत बैठक पार पडली मात्र तोडगा नाहीच
रायगड जिल्हा परिषदेचा तिढा सुटत नसल्याचे पाहायला मिळत आहे. काल रायगड जिल्हा परिषदेबाबत नंदनवनवर बैठक झाली. या सुनील तटकरे, उदय सामंत, एकनाथ शिंदे यांच्यात काल रात्री ही बैठक पार पडली.
Sunetra Pawar : राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवारांचं नाव निश्चित; राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीची कार्यकारिणीची आज बैठक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीची कार्यकारिणीची बैठक आज पार पडणार आहे. याच बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं जाणार आहे.
Ajit Pawar Plane Crash Case : अजित पवार विमान अपघात प्रकरण; ब्लॅक बॉक्सबाबत महत्त्वाची माहिती समोर
ब्लॅक बॉक्सबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. विमान अपघातानंतर सापडलेला ब्लॅक बॉक्स सुरक्षित बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
Congress : राज्यसभा निवडणुकीबाबत काँग्रेसची आज बैठक
राज्यसभा निवडणुकीबाबत काँग्रेसची आज बैठक होणार असून सकाळी 10 वाजता विधानभवनात ही बैठक होणार आहे.
Budget session : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस; विरोधक वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याची
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज चौथा दिवस असून विरोधक वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याची शक्यता आहे.