'आप'ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळणार; कशी असते प्रक्रिया,  काय होतो फायदा?
ANI

'आप'ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळणार; कशी असते प्रक्रिया, काय होतो फायदा?

10 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या आम आदमी पक्षाला आता राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळणार आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपासोबत आपसुद्धा चर्चेत आलं.
Published by :
Siddhi Naringrekar

10 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या आम आदमी पक्षाला आता राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळणार आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपासोबत आपसुद्धा चर्चेत आलं. आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे दिसत आहे. दिल्ली आणि पंजाबमध्ये आपचे सरकार आहे. तर, गोवा विधानसभा निवडणुकीत 6 टक्के मते मिळवली. तर, गुजरातमध्ये 12.92 टक्के मिळवली.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्वात झालेल्या 2011 मधील भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात अरविंद केजरीवाल यांची प्रमुख भूमिका होती. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी राजकीय पक्षांकडे किमान तीन राज्यात लोकसभेच्या 2 टक्के जागा असायला हव्यात, म्हणजेच लोकसभेच्या 11 जागा असाव्यात. मात्र, आम आदमी पक्षाचा लोकसभेत एकही खासदार नाही. एखाद्या राजकीय पक्षाला चार राज्यात प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळाल्यास त्या राजकीय पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळू शकतो. प्रादेशिक पक्ष, राज्यस्तरीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी राज्याच्या विधानसभा निवडणुकीत किमान सहा टक्के मते अथवा दोन जागा निवडून आणणे आवश्यक आहे.

आप' आता निवडणूक प्रचारात अधिकाधिक 40 स्टार प्रचारक नेमू शकतात. या प्रचारकांचा खर्च उमेदवारांसाठीच्या खर्चातून न होता, पक्षाच्या खात्यातून केला जाणार. राष्ट्रीय पक्ष घोषित झाल्यावर पक्षाचे मुख्यालय बांधण्यासाठी सवलतीच्या दरात सरकारी जमीन मिळते. मान्यताप्राप्त राज्य किंवा राष्ट्रीय पक्षाकडून नामांकन दाखल करण्यासाठी फक्त एकाच प्रस्तावकाची आवश्यकता असते. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्यानंतर आम आदमी पक्षाचे निवडणूक चिन्ह झाडू हे संपूर्ण देशभरात कायम राहणार. या निवडणूक चिन्हावर इतर दावा करू शकणार नाहीत. सार्वत्रिक निवडणुकीच्या कार्यकाळात दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओवर पक्षाच्या प्रचारासाठी वेळ मिळणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com