Abhijit Majumdar Death : संगीतविश्वाला दुःखद धक्का! सुप्रसिद्ध संगीतकार अभिजित मजुमदार यांचे 54 व्या वर्षी निधन
संगीतविश्वातून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. ओडिया संगीतसृष्टीतील सुप्रसिद्ध संगीतकार अभिजित मजुमदार यांचे वयाच्या ५४ व्या वर्षी निधन झाले. दीर्घकाळ चाललेल्या आजारामुळे ते उपचार घेत होते, मात्र अखेर रविवारी त्यांनी प्राण सोडले.
अभिजित मजुमदार गेल्या अनेक महिन्यांपासून गंभीर आजाराशी लढा देत होते. भुवनेश्वरमधील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. काही काळ त्यांची तब्येत स्थिर वाटत होती, पण पुन्हा प्रकृती बिघडली आणि त्यांची झुंज अपयशी ठरली. त्यांच्या जाण्याने चाहत्यांसह संपूर्ण संगीत क्षेत्र हळहळले आहे.
त्यांच्या निधनावर ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनीही शोक व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली अर्पण करत अभिजित मजुमदार यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानाचा उल्लेख केला आणि कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या. अभिजित मजुमदार यांच्या सुरांनी ओडिया संगीताला वेगळी ओळख दिली. त्यांच्या आठवणी संगीतप्रेमींच्या मनात कायम जिवंत राहतील.
थोडक्यात
संगीतविश्वातून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे.
ओडिया संगीतसृष्टीतील सुप्रसिद्ध संगीतकार अभिजित मजुमदार यांचे निधन झाले आहे.
वयाच्या ५४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
दीर्घकाळ आजाराशी झुंज देत ते उपचार घेत होते.
रविवारी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

