Kolhapur Crime : कोल्हापूरमध्ये गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश, बोगस डॉक्टर पसार

कोल्हापूरच्या बालिंगा इथ गर्भपात रॅकेट उघडकीस आले. त्यामध्ये एक एजंट आणि गर्भ तपासणी करण्यासाठी आलेल्या एका महिलेला ताब्यात घेतले आहे.
Published by :
Riddhi Vanne

कोल्हापूरच्या बालिंगा इथ गर्भपात रॅकेट उघडकीस आले. त्यामध्ये एक एजंट आणि गर्भ तपासणी करण्यासाठी आलेल्या एका महिलेला ताब्यात घेतले आहे. यावेळी तपासणी पथक आल्याचे समजताच बोगस डॉक्टर स्वप्निल केरबा पाटील हा पसार झाला, तर ताब्यात घेतलेल्या एजंटचे नाव दिगंबर मारुती किल्लेदार असे आहे. या तपासणीमध्ये गर्भलिंग निदान सोनोग्राफी मशीन, ९८ गर्भपात गोळ्यांचे किट, जेल असे साहित्य ताब्यात घेतले आहे. दरम्यान करवीर पोलीस ठाण्यात स्वप्निल केरबा पाटील आणि दिगंबर मारुती किल्लेदार यांच्या वरती रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com