ताज्या बातम्या
Abu Azmi : अबू आझमींच्या निलंबनाचा ठराव विधानसभेत एकमताने मंजूर
आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी आता राज्यात वाद निर्माण झाला आहे.
आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी आता राज्यात वाद निर्माण झाला आहे. औरंगजेबाचे त्यांनी कौतुक केलं होतं. यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहे.
याच पार्श्वभूमीवर आता अबू आझमींच्या निलंबनाचा ठराव विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आला आहे. अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आवाजी मतदान घेतलं. या आवाजी मतदानामध्ये एकमताने ठराव मंजूर झाल्याचं जाहीर करत अबू आझमींना निलंबित करण्यात आले. अधिवेशन संपेपर्यंत सपा आमदार अबू आझमी यांचं निलंबन करण्यात आलं आहे.