Ambadas Danve
Ambadas Danve

Ambadas Danve : मंत्रालयात अन्न, औषध प्रशासन विभागात ACBची कारवाई; अंबादास दानवे ट्विट करत म्हणाले...

मंत्रालयात झिरवाळांच्या अन्न, औषध प्रशासन विभागात ACBने कारवाई केली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Ambadas Danve) मंत्रालयात झिरवाळांच्या अन्न, औषध प्रशासन विभागात ACBने कारवाई केली आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागातील एका लिपिकाला लाच घेताना अटक करण्यात आली असून आरोपीचे नाव राजेंद्र ढेरंगे असे आहे.

एका मेडिकल स्टोअरचा निलंबित परवाना पुन्हा सुरू करण्यासाठी लिपिकाने आधी 50000 रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर 35000 रुपयांची लाच घेताना त्याला अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावर लाच आरोपीला पकडण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. मंत्रालयातील एफडीए विभाग राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या अखत्यारीत येतो. या सर्व प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर आता अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अंबादास दानवे म्हणाले की, ' ज्या FDA विभागावर राज्याच्या आरोग्याची जबाबदारी आहे, तिथेच ३५ हजारांत 'इमान' विकले जातेय, हे महाराष्ट्राचे दुर्दैव! आरोपी मंत्र्यांच्या स्टाफशी संबंधित असणे आणि तपासात 'अप्पा शिंदे' यांचे नाव येणे, हे निव्वळ योगायोग असू शकत नाहीत. फाईल क्लिअरन्सच्या नावाखाली मंत्रालयात नक्की कशाचा बाजार मांडलाय? खालपासून वरपर्यंत सर्वांचे 'टेबल' ठरले आहेत का? एसीबीने फक्त फांद्या छाटू नयेत, बुंध्यावर घाव घालावा! असे अंबादास दानवे म्हणाले.

Summary

  • मंत्रालयात अन्न, औषध प्रशासन विभागात ACBची कारवाई

  • अंबादास दानवे यांची ट्विट करत प्रतिक्रिया

  • 'एसीबीने फक्त फांद्या छाटू नयेत, बुंध्यावर घाव घालावा!'

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com