Virar Ambedkar Jayanti News
Virar Ambedkar Jayanti News

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मिरवणूकीत दुर्घटना; वीजेच्या धक्क्याने 2 जणांचा जागीच मृत्यू, 5 जण गंभीर जखमी

डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती मिरवणुकीदरम्यान वीजेचा धक्का लागल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले.
Published by :
Pankaj Prabhakar Rane

संदीप गायकवाड : विरार | महाराष्ट्रासह देशभरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. आंबेडकर जयंतीनिमित्त ठिकठिकाणी भीमसैनिकांकडून जल्लोष साजरात केला जातोय. अशातच विरामधून एक दुर्देवी घटना समोर आली आहे. आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीदरम्यान विजेचा धक्का लागून 2 तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 5 जण गंभीर जखमी झालेत.

जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. विरारच्या कारगिल नगर परिसरात गुरूवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. रुपेश सुर्वे (वय 30 वर्ष) आणि सुमित सुत (वय 23 वर्ष) अशी मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत. आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येलाच ही दुर्देवी घटना घडल्याने परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

नेमकं काय घडलं?

विरारच्या कारगिल नगर येथील बौध्दजन पंचायत समितीतर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. रात्री 9 वाजता निघालेली ही मिरवणूक साडेदहा वाजता संपली. कागगिल चौकातून मिरवणूक संपवून कार्यकर्ते घरी परतत होते.

त्यावेळी मिरवणूक वाहनावर (ट्रॉली) 6 जण उभे होते. त्यावेळी वाहनावरील लोखंडी रॉड जवळील रोहित्राला लागला. त्या वीजप्रवाहामुळे वाहनावरील 6 जण होरपळले. त्यातील रुपेश सुर्वे (30 ) आणि सुमित सुत 23 ) या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला . तर 5 जण जखमी झाले.

उमेश कनोजिया (वय 18 वर्ष) राहुल जगताप (वय 18 वर्ष), सत्यनारायण (वय 23 वर्ष) आणि अस्मित खांबे (वय 32 वर्ष), अशी जखमी तरुणांची नावे आहेत. जखमींपैकी अस्मित खांबे याची प्रकृती स्थिर असून उमेश, राहुल आणि सत्यनारायण यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

तिघांनाही मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मिरवणुकीतून परताना ट्रॉलीवरील लोखंडी रॉडचा रोहित्राला (ट्रान्सफॉर्मर) धक्का लागल्याने वीजेचा झटका लागून ही दुर्घटना घडल्याची माहिती विरारचे सहाय्यक पोलिस (Police) आयुक्त रामचंद्र देशमुख यांनी दिली. या दुर्घटनेमुळे शहरावर शोककळा पसरली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com