नागपूरात भीषण अपघात; उड्डाणपुलावरुन 80 फूट खाली पडून चौघांचा मृत्यू

नागपूरात भीषण अपघात; उड्डाणपुलावरुन 80 फूट खाली पडून चौघांचा मृत्यू

नागपूरमध्ये भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.

नागपूरमध्ये भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. कार चालकाने तीन दुचाकी स्वारांना मागून जोरदार धडक दिल्यामुळे दुचाकीवरील लोक ८० फूट उड्डाणपुलावरुन खाली फेकले गेले. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन लहान चिमुकल्यांचा समावेश आहे.

नागपूर शहरातील सक्करदरा पुलावर आरोपी कार चालकाने विरुद्ध दिशेने कार भरधाव वेगाने पळवण्याचा प्रयत्न केला. कारने एकापाठोपाठ तीन गाड्यांना जबर धकड दिली. त्यात एका दुचाकीवर एक इसम त्यांचे दोन मुलं आणि त्या इसमाची आई जात होती. त्या दुचाकीला कराने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की, हे चौघेही ७० ते ८० फूट पुलावरुन खाली फेकले गेले. या अपघातात चौघांचाही मृत्यू झाला आहे.

नागपूरमध्ये रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास सक्करदरा फ्लायओवरवर हा अपघात झाला.पोलिसांनी धडक देणाऱ्या चारचाकी वाहनाच्या चालकाला ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेण्यात आलेला व्यक्ती कार मालकाचा ड्रायव्हर असल्याची माहिती समोर आली आहे.

Lokshahi
www.lokshahi.com