दसरा मेळाव्यासाठी निघालेल्या शिंदे गटाच्या शिवसैनिकांचा भीषण अपघात, एकाचा मृत्यू

दसरा मेळाव्यासाठी निघालेल्या शिंदे गटाच्या शिवसैनिकांचा भीषण अपघात, एकाचा मृत्यू

आझाद मैदान आणि शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

आझाद मैदान आणि शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. आझाद मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा आहे तर शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा आहे. ठाकरे आणि शिंदे गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे.

यातच एक नवी घटना समोर आली आहे. शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी मुंबईला निघालेल्या शिवसैनिकांच्या गाडीचा पहाटेच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात एक ठार तर तिघे जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

कवठेमहांकाळ तालुक्यातून जाणाऱ्या रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील शिरढोण गावाजवळील ही घटना घडली आहे. ट्रकने पदाधिकाऱ्याच्या गाडीला मागून धडक दिली. शिंदे गटाच्या युवा सेनेचे हे पदाधिकारी असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com