INDIA TVच्या सर्वेनुसार लोकसभा निवडणुकीत कोणाला किती जागा?

INDIA TVच्या सर्वेनुसार लोकसभा निवडणुकीत कोणाला किती जागा?

लोकसभा निवडणूक २०२४ साठी आता फक्त काही महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. सत्ताधारी भाजपसह विरोधी पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.
Published by  :
shweta walge

लोकसभा निवडणूक २०२४ साठी आता फक्त काही महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. सत्ताधारी भाजपसह विरोधी पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाला फक्त 4 जागांचा फायदा होऊ शकतो. INDIA TVच्या सर्वेक्षणातून हे निरीक्षण मांडण्यात आलंय.

INDIA TVच्या सर्वेनुसार शिवसेना एकनाथ शिंदे गटाला 2 तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 2 जागांवर समाधान मानावं लागे. तर भाजपला 20 जागा मिळतील. ठाकरे गटाला 11 जागा, काँग्रेसला 9 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला 4 जागा मिळती. थोडक्यात INDIA TVच्या या सर्वेक्षणानुसार एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या येण्याने भाजपला फार मोठा फायदा होताना दिसत नाहीये. महायुतीला 24 तर महाविकास आघाडीला 24. म्हणजेच दोन्ही युतीला 50 - 50 टक्के जागा मिळणार असल्याचं INDIA TVच्या या सर्वेक्षणातून दिसून येतंय.

लोकसभेसाठी INDIA TV च्या सर्वेतून कोणाला किती जागा

१ भाजपा -२०

२ काँग्रेस - ०९

३ शिवसेने शिंदे गट - ०२

४ शिवसेने ठाकरे गट - ११

५ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - अजित पवार गट - ०२

६ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरद पवार गट- ०४

भाजपाला अजित पवार आणि शिंदेमुळे काही फायदा झाला नाही ते या सर्वेतून दिसत आहे. INDIA TV च्या सर्वेतून महायुतीला २४ तर महाविकास आघाडीला २४ सीट जाणार हेच दिसत आहे. दोन्ही युतीला ५० -५० % जागा मिळतील असा हा सर्वे आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com