नव्या शैक्षणिक धोरणानुसार पुढच्या वर्षी 10वी-12वी बोर्डाची परीक्षा होणार की नाही?;बोर्डानेच केलं स्पष्ट
Admin

नव्या शैक्षणिक धोरणानुसार पुढच्या वर्षी 10वी-12वी बोर्डाची परीक्षा होणार की नाही?;बोर्डानेच केलं स्पष्ट

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा होणार की नाही असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा होणार की नाही असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. या पार्श्वभूमीवर बारावीचा निकाल जाहीर करताना गोसावी यांनी दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांबाबत माहिती दिली.

नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण प्रत्यक्षात लागू झाल्यानंतरही दहावी-बारावीची बोर्डाची परीक्षा होणारच आहे. पुढील वर्षी देखील दहावी-बारावीची बोर्डाची परीक्षा प्रचलित पद्धतीप्रमाणेच होणार आहे. असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com