Shah Rukh Khan
Shah Rukh Khan

अभिनेता शाहरुख खान धमकीप्रकरणी आरोपीला 18 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

छत्तीसगडमधील रायपूरमधून आरोपीला अटक
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • अभिनेता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी

  • छत्तीसगडमधील रायपूरमधून आरोपीला अटक

  • आरोपीला 18 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

अभिनेता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. सलमान खाननंतर शाहरुख खानलासुद्धा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. याबाबत वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात होता.

त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. छत्तीसगडमधील रायपूर येथील त्याच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली. आरोपीकडून अभिनेत्याला धमकीचा फोन करून 50 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती.

याच पार्श्वभूमीवर आता वांद्रे न्यायालयाने आरोपीला 18 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मुंबई पोलिसांनी 12 नोव्हेंबरला आरोपीला रायपूर येथून अटक केली होती.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com