Pune : दर्ग्यावरील कारवाई ही केवळ अफवा; पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती

पुण्यात शेख सल्लाह दर्ग्यावर कारवाई होणार अशी अफवा पसरली होती.
Published by :
Team Lokshahi

अमोल धर्माधिकारी, पुणे

पुण्यात शेख सल्लाह दर्ग्यावर कारवाई होणार अशी अफवा पसरली होती. कारवाईच्या या अफवेमुळे पुणे शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर आता पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, परिस्थिती पूर्ण नियंत्रणात आहे.कुणी तरी अफवा पसरवली आहे की इथे कारवाई होणार. पण असं काही नाही. कुणी ही अफवांवर विश्वास ठेवू नये.

आज सकाळी याबाबत पोलीस आयुक्त कार्यालयात बैठक घेतली जाणार आहे. पुणे शहरात शांतता राहील यासाठी पोलीस पूर्णपणे तयारीत आहे. कुणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. तसेच या ठिकाणी कोणतीही कारवाई नियोजित नाही. जी कारवाई होईल ती कायद्याच्या नियमानुसारच होईल. असं पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com