ताज्या बातम्या
खोक्या उर्फ सतीश भोसलेला VIP ट्रीटमेंट देणाऱ्या पोलिसांवर कारवाई
काही दिवसांपूर्वी खोक्याच्या नातेवाइकांनी घरुन आणलेला डबा खातानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.
खोक्या उर्फ सतीश भोसलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र त्याला कोठडीमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याची माहिती समोर आली होती. अशातच आता खोक्याला तुरुंगामध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट देणाऱ्या पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी खोक्याच्या नातेवाइकांनी घरुन आणलेला डबा खातानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर या सगळ्या प्रकारावर पोलीस अधीक्षकांनी कारवाई केली. त्यामुळे या प्रकरणात जे दोन पोलीस सतीश भोसलेला मदत करत होते त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.