Nana Patekar : अभिनेते नाना पाटेकर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार?

Nana Patekar : अभिनेते नाना पाटेकर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार?

लोकसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता अभिनेते नाना पाटेकर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. राष्ट्रवादीकडून नाना पाटेकर यांना लोकसभेची ऑफर देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मात्र नाना पाटेकरानी ऑफर नाकारल्याची माहिती आहे.

पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी त्यांना विचारण्यात आल्याचे समजते. अमोल कोल्हेंसमोर उमेदवार उभा करण्यासाठी राष्ट्रवादीकडून नानांना विचारण्यात आल्याची माहिती आहे. मात्र राष्ट्रवादीची ही ऑफर नानांची नाकारली असल्याचे समजते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com