Actor Siddharth Khirid Tie Knot With Maithili Bhosekar Wedding Photo Viral
Actor Siddharth Khirid Tie Knot With Maithili Bhosekar Wedding Photo Viral

Siddharth Khird Wedding : सिद्धार्थ खिरीडचा शुभविवाह! नववधू कोण? कलाकारांच्या उपस्थितीत पार पडला सोहळा

Siddharth Khird Wedding: अखेर सिद्धार्थ खिरीड चढला बोहल्यावर; बायको आहे तरी कोण? लग्नाला कलाकारांची उपस्थिती
Published by :
Riddhi Vanne
Published on

मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या लग्नांचा सिझन सुरू असल्याचं चित्र दिसत आहे. अनेक प्रसिद्ध कलाकार विवाहबंधनात अडकत नवा प्रवास सुरू करत असून, आता या आनंदाच्या यादीत अभिनेता सिद्धार्थ खिरीडचं नावही सामील झालं आहे.

सिद्धार्थने नुकताच आपल्या आयुष्याच्या नव्या अध्यायाला सुरुवात केली असून त्याच्या लग्नाचे सुंदर क्षण सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहेत. छोट्या पडद्यावर वेगवेगळ्या भूमिकांतून प्रेक्षकांची मनं जिंकणारा सिद्धार्थ आता प्रत्यक्ष आयुष्यात नवरा बनला आहे. त्याच्या लग्नसोहळ्याला मराठी कलाविश्वातील अनेक चेहरे उपस्थित होते.

सिद्धार्थने आपल्या दीर्घकाळच्या मैत्रीला प्रेम आणि मग विवाहाचं रूप दिलं आहे. त्याची पत्नी डॉ. मैथिली भोसेकर ही एक डॉक्टर असून सौंदर्यस्पर्धेतील मानाचा किताब तिने जिंकला आहे. दोघांची जोडी चाहत्यांना विशेष भावली असून त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहेत. पारंपरिक आणि साध्या वातावरणात पार पडलेल्या या लग्नाने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. नवविवाहित जोडप्याच्या पुढील वाटचालीसाठी सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

थोडक्यात

  1. मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या लग्नांचा सिझन सुरू असल्याचं चित्र दिसत आहे.

  2. अनेक प्रसिद्ध कलाकार विवाहबंधनात अडकत नवा आयुष्याचा प्रवास सुरू करत आहेत.

  3. या आनंदाच्या यादीत आता अभिनेता सिद्धार्थ खिरीड याचं नावही सामील झालं आहे.

  4. सिद्धार्थच्या लग्नामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता आणि आनंदाचं वातावरण आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com