Marathi Actress Gayatri Datar Engaged: अभिनेत्री गायत्री दातारने गुपचुप उरकला साखरपुडा; कॅप्शनने वेधलं सर्वांचे लक्ष
(Marathi Actress Gayatri Datar Engaged) मनोरंजन क्षेत्रात सध्या लग्नाची धामधूम सुरू आहे. अलीकडेच अभिनेत्री तेजस्विनी लोणार यांनी शिवसेनेतील एका मोठ्या नेत्याच्या मुलाशी विवाह केला. त्यानंतर महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व आदेश बांदेकर यांच्या मुलाचाही अभिनेत्री पूजा बिरारीसोबत विवाह पार पडला. आता याच मालिकेत आणखी एका मराठी अभिनेत्रीच्या आयुष्यात आनंदाची बातमी आली आहे.
‘तुला पाहते रे’ या लोकप्रिय मालिकेतून प्रसिद्धी मिळवलेल्या अभिनेत्री गायत्री दातार हिने तिच्या खासगी आयुष्यातील गोड क्षण चाहत्यांसोबत शेअर केला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत गायत्रीने आपल्या आयुष्यातील खास व्यक्तीची ओळख करून दिली आहे. तिने एक सुंदर फोटो शेअर करत आपला साखरपुडा झाल्याची माहिती दिली आहे.
गायत्रीने पोस्टमध्ये तिच्या होणाऱ्या जोडीदारासोबतचा फोटो टाकला असून साखरपुड्याची अंगठीही दाखवली आहे. या फोटोसोबत तिने भावूक शब्दांत कॅप्शन लिहिले आहे.
कॅप्शनने वेधले लक्ष
“माझ्या आयुष्यातील खास व्यक्ती भेटली आहे. हा दिवस माझ्यासाठी खूपच खास आहे,” असे शब्द गायत्रीने लिहिले आहेत. तसेच ११ डिसेंबर रोजी साखरपुडा पार पडल्याचेही तिने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता लवकरच तिच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, फोटोमध्ये तिच्या होणाऱ्या पतीचे नाव किंवा ओळख अद्याप तिने उघड केलेली नाही.
गायत्रीच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या असून लाईक्स आणि प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. गायत्री दातारने झी मराठीवरील ‘तुला पाहते रे’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर ती ‘अबीर गुलाल’ या मालिकेत दिसली. तसेच ‘बिग बॉस मराठी’ आणि ‘चल भावा सिटीत’ या रिअॅलिटी कार्यक्रमांतूनही तिने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
थोडक्यात
मनोरंजन क्षेत्रात सध्या लग्नाची धामधूम सुरू आहे.
अलीकडेच अभिनेत्री तेजस्विनी लोणार यांनी शिवसेनेतील एका मोठ्या नेत्याच्या मुलाशी विवाह केला.
त्यानंतर महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व आदेश बांदेकर यांच्या मुलाचाही अभिनेत्री पूजा बिरारीसोबत विवाह पार पडला.

