ताज्या बातम्या
Kangana Ranaut : घर बंद असून कंगना रनौतला आलं एक लाख रुपये वीज बिल, अभिनेत्री म्हणाली…
अभिनेत्री कंगना रणौत नेहमी वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असते.
अभिनेत्री कंगना रणौत नेहमी वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असते. कंगनाचे मुंबईत घर आहेच याशिवाय तिचे मनालीमध्येही एक घर आहे. तर या मनालीतील कंगनाच्या घराचं वीज बिल एक लाख रुपये आल्याचं सांगितलं आहे.
एवढे वीज बील पाहून कंगनाला धक्का बसला आहे. मनालीमधील घरात जास्त राहत नसतानासुद्धा एवढे बील आल्याने अभिनेत्रीने हिमाचल प्रदेश सरकारवर जोरदार टीका केली आहे.
याच पार्श्वभूमीवर कंगना म्हणाली की, "या महिन्यात माझ्या मनालीतील घराचं विजेचं बिल 1 लाख रुपये आलं. या घरात मी राहतही नाही. इतकी दुर्दशा आहे. शरम वाटते की हे काय आहे. आपल्याकडे एक संधी आहे. तुम्ही सर्वजण जे मला माझ्या भावाबहिणींसारखे आहेत, तुम्ही ग्राऊंड लेव्हलला इतकं काम करता. आपलं दायित्व आहे आपल्याला या देशाला, प्रदेशाला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जायचंय."