Priya Marathe : अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन; धक्कादायक कारण समोर

Priya Marathe : अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन; धक्कादायक कारण समोर

टीव्ही आणि मराठी मालिकांमधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री प्रिया मराठे यांचं निधन झालं आहे.
Published on

टीव्ही आणि मराठी मालिकांमधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री प्रिया मराठे यांचं निधन झालं आहे. वयाच्या 38 व्या वर्षी कर्करोगाशी झुंज देत आज (रविवार) पहाटे चार वाजता तिने अखेरचा श्वास घेतला. तिच्या जाण्याने कलाविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.

प्रिया मराठे यांनी ‘पवित्र रिश्ता’, ‘साथ निभाना साथियाँ’, ‘तुझेच मी गीत गात आहे’ यांसारख्या अनेक लोकप्रिय मालिकांमधून भूमिका साकारल्या. दमदार अभिनय आणि वेगळ्या शैलीतून तिने प्रेक्षकांची मने जिंकली होती. मागील काही महिन्यांपासून प्रिया अभिनयापासून दूर होती आणि सोशल मीडियावरही सक्रिय दिसत नव्हती.

तिने शेवटची भूमिका ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत साकारली होती. मात्र आरोग्याच्या अडचणींमुळे तिला ही मालिका मधेच सोडावी लागली. त्यावेळी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत तिने चाहत्यांना ही माहिती दिली होती. “शूटिंगचं वेळापत्रक आणि माझं आरोग्य एकत्र सांभाळणं कठीण होतं. त्यामुळे मला हा प्रवास इथेच थांबवावा लागतोय,” असं तिने सांगितलं होतं.

प्रियाच्या अचानक झालेल्या निधनाची बातमी समजताच चाहत्यांपासून ते सहकलाकारांपर्यंत सर्वांनी दुःख व्यक्त केलं आहे. वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी तिचा जीव कर्करोगाने घेतल्याने मराठी व हिंदी कलाविश्वाला मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com