Ganeshotsav 2025 : स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देत अभिनेत्री सायली संजीवने केली गणरायाची प्राण प्रतिष्ठापना
Actress Sayali Sanjeev performed the Pran Instahapana of Ganesha : मराठी अभिनेत्री सायली संजीवनंही आपल्या नाशिकमधील घरी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली आहे. विशेष म्हणजे अगदी सुरुवातीपासूनच सायली पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करते. बाप्पासाठी आरासही स्वता पर्यावरणपुरक तयार करते. यंदाही तिने अतिशय साध्या पद्धतीने श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली. विशेष म्हणजे स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देण्यासाठी सायली स्वतः आपल्या हातानं घरात श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करते. यंदाही तिने पहाटे ब्रम्हमुहूर्तावर गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली. याचसंदर्भात सायलीने लोकशाही मराठीसोबत संवाद साधला.
त्यावेळी सायली संजीव म्हणाली की, "यंदा माझ्या भावाच्या मुलीसोबत गणपती बसवत आहे. दरवर्षी मी एकटी गणपती बसवत होती. त्यामुळे मला जास्त आनंद होत आहे. तिला सुद्धा आपल्या परपंरा समजत आहे. सर्वांनी पर्यावरणपुरक गणपती बाप्पाचा सण साजरा केला पाहिजे. बाप्पा आपल्या जवळचा विषय आहे, त्यामुळे पर्यावरणाल जपून सण साजरा केला पाहिजे."