Shilpa Shetty : अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिची आर्थिक गुन्हे कडून चौकशी सुरू, 'या' संदर्भांत आज उच्च न्यायालयात सुनावणी

Shilpa Shetty : अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिची आर्थिक गुन्हे कडून चौकशी सुरू, 'या' संदर्भांत आज उच्च न्यायालयात सुनावणी

जवळपास ६० कोटी रुपयांचा फसवणुकीच्या आरोपाप्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा व्यावसायिक पती राज कुंद्रा यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

जवळपास ६० कोटी रुपयांचा फसवणुकीच्या आरोपाप्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा व्यावसायिक पती राज कुंद्रा यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिची आर्थिक गुन्हे कडून चौकशी सुरू आहे. मात्र परदेशात कार्यक्रमासाठी जायचे असल्याने पुन्हा कोर्टात आल्या आहे. परदेशात जायची परवानगी न्यायालय देणार का जी बघणे महत्त्वाचे आहेगुन्हा रद्द करण्याच्या मागणीव्यतिरिक्त, या दाम्पत्याने पोलिसांना आरोपपत्र दाखल करण्यापासून मज्जाव करणे आणि प्रकरण न्यायप्रविष्ट असेपर्यंत त्यांच्याविरोधात कोणतीही कठोर कावाई न करण्याचे आदेश देण्याची मागणी देखील केली आहे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठापुढे शिल्पा आणि राज यांच्या याचिका सोमवारी सुनावणीसाठी आल्या. त्यावेळी, याचिकेची प्रत मूळ तक्रारदार दीपक कोठारी यांना देण्याचे आदेश देऊन न्यायालयाने प्रकरणाची सुनावणी आज होणार आहे.

प्रकरण काय ?

बेस्ट डील टीव्ही प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन शॉपिंग कंपनीचे राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी हे 'संचालक होते. २०१५ ते २०२३ दरम्यान या कंपनीत ६० कोटी ४८ लाख रुपयांची गुंतवणूक फिर्यादी व्यवसायिक दीपक कोठारी यांनी केली होती. ८७.६ टक्के समभाग या कंपनीतील या दोघांच्या नावावर होते, 'शेअर सबस्क्रिप्शन अॅग्रीमेंट' अंतर्गत कंपनीतकोठारी यांनी एप्रिल २०१५ मध्ये ३१.९ कोटी रुपये गुंतवले. त्यानंतर विस्तारित करारांतर्गत सप्टेंबर २०१५ मध्ये आणखी २८.५३ कोटी रुपये वळवते केले. मात्र, शिल्पा आणि राज यांनी ही रक्कम वैयक्तिक खर्चासाठी वापरली, असा आरोप कोठारी यांनी पोलिसांत दाखल तक्रारीत केला आहे.

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्यावर ६० कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या आरोपाखाली चौकशी सुरू केली आहे. ही चौकशी एका खासगी वित्तीय संस्थेच्या संचालकाच्या तक्रारीवरून सुरू झाली आहे, ज्यानुसार २०१६ मध्ये 'बेस्ट डील टीव्ही' कंपनीमध्ये गुंतवणुकीच्या बदल्यात पैसे फसल्याचा आरोप आहे. शिल्पा शेट्टीची ५ तासांहून अधिक चौकशी झाली असून, या प्रकरणात तिचा पती राज कुंद्रा आणि तिच्या कंपनीच्या बँक खात्यांचा संबंध असल्याचं उघड झालं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com